वेदांतवर नकारात्मक आरोपानंतर बँक ऑफ अमेरिकेची सकारात्मक शिफारस; आर्थिक स्थिती बळकट असल्याचा अहवाल

नवी दिल्ली – ब्रिटनमध्ये नोंदणी असलेल्या वेदांत रिसोर्सेस कंपनीवर अमेरिकेतील व्हॉईसरॉय रिसर्च या कंपनीने कर्जबाजारी असल्याचा आरोप आपल्या संशोधन अहवालात केला आहे. वेदांत रिसोर्स या कंपनीची भारतामध्ये वेदांत नावाची उपकंपनी आहे. व्हाईसरॉय रिसर्चने नकारात्मक अहवाल जाहीर केला असला तरी इतर अनेक पथमानांकन संस्था मात्र वेदांत रिसोर्सेस कंपनीची आर्थिक परिस्थितीस बळकट असल्याचे अहवाल जाहीर करत आहेत.
बँक ऑफ अमेरिका ग्लोबल रिसर्च या संस्थेने यासंदर्भात जारी केलेल्या टिपणात म्हटले आहे की, या कंपनीवर असलेले कर्ज परतफेड करण्यात इतके आहे. त्याचबरोबर सध्या कंपनीच्या शेअरचा भाव योग्य पातळीवर असून दीर्घ पल्ल्यात या शेअरमधून सकारात्मक परतावा मिळू शकतो असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
व्हॉईसराय रिसर्च कंपनीने वेदांत रिसोर्सेस कर्जबाजारी असल्याचे म्हटले आहे. मात्र प्रत्यक्षामध्ये वेदांत रिसोर्सेस कंपनीने आपल्यावरील कर्जाचा बोजा कमी करत 5.3 अब्ज डॉलरवर आणला आहे. या बाबीची बँक ऑफ अमेरिका ग्लोबल रिसर्च च्या अहवालात दखल घेत आली आहे.
कंपनीने आपल्यावरील कर्जाचे रक्कम कमी केल्यामुळे कर्जावरील व्याजाची रक्कमही कमी झाली आहे. 2025 या आर्थिक वर्षात वेदांत रिसोर्सेसला आपल्या एकूण महसूलापैकी 14 टक्के रक्कम व्याजावर खर्च करावी लागत होती.
आता यावर्षी हे प्रमाण कमी होऊन 11% वर आले आहे. आगामी काळामध्ये हे प्रमाण आणखी कमी होण्याची शक्यता आहे. व्हॉईसरच्या कंपनीने केलेल्या आरोपाचा वेदांत रिसोर्सेस या कंपनीने तीव्र शब्दात इन्कार केला आहे. वेदांत रिसोर्सेसने म्हटले आहे की व्हॉईसरॉय रिसर्च कंपनीचा अहवाल दूषित हेतूने तयार करण्यात आला आहे.





