Vedaa Trailer । अखेर प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर जॉन अब्राहमच्या ‘वेदा’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटाला सेन्सॉरनेही मंजुरी दिली असून आता तो १५ ऑगस्टला प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटात शर्वरी वाघ , अभिषेक बॅनर्जी आणि तमन्ना भाटिया यांच्याही भूमिका आहेत. निखिल अडवाणी दिग्दर्शित ‘वेदा’ सुरुवातीला 12 जुलै रोजी रिलीज होणार होता, परंतू नंतर निर्मात्यांनी तो 15 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलला. ‘वेदा’ ही खऱ्या कथेपासून प्रेरित असल्याचे म्हटले जाते. ‘वेदा’चा ट्रेलर चाहत्यांना खूप आवडला आहे. जॉन अब्राहमसोबतच शर्वरी वाघच्या स्टाईलने त्याला चकित केले आहे. काही डायलॉग्सचे कौतुकही केले जात आहे, ज्याची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळाली आहे. ट्रेलरमधील डायलॉग सर्वांचे मन जिंकून घेतात. शर्वरीचा हा डायलॉग ऐकून चाहत्यांनी ट्रेलरच्या कंमेंस्टमध्ये अभिनेत्रींचे कौतुक केले आहे. ‘वेद’ ही एका माणसाच्या पराक्रमाची आणि शौर्याची कथा आहे. एका कठोर व्यवस्थेला आव्हान देणाऱ्या बंडाची ही कथा आहे. ही एक तरुण स्त्रीचीही कथा आहे. वेदाला न्याय मिळवून देण्यासाठी मदत करणाऱ्या माणसाची ही कथा आहे. ‘वेदा’ला अद्याप सेन्सॉर बोर्डाकडून रिलीजसाठी मंजुरी मिळाली नसल्याची माहिती गेल्या काही दिवसापासून चर्चेत आहे. या चित्रपटाला सेन्सॉर प्रमाणपत्र देण्यात आले नव्हते. त्यामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. सेन्सॉर बोर्डाची वृत्ती पाहून निर्माते देखील संतापले आणि त्यांनी एक निवेदन जारी केले की त्यांनी सर्व नियमांचे पालन करून चित्रपट प्रदर्शित होण्याच्या 8 आठवडे आधी प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. सेन्सॉर बोर्डाने 25 जूनला हा चित्रपट पाहिला होता, मात्र तो रिव्ह्यू कमिटीकडे अडकला होता. आता अखेर मार्ग मोकळा झाला असून आता ‘वेदा’ 15 ऑगस्टला कोणत्याही अडथळ्याशिवाय रिलीजसाठी सज्ज झाला आहे.