Vasota fort : वासोटा किल्ला पर्यटकांसाठी तीन दिवस राहणार बंद; वनविभाची माहिती

पुणेः येत्या काही दिवसांवर 31 डिसेंबर येवून ठपलेला आहे. या दिवशी मोठ्या उत्साहात जुन्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत केले जाते. या कालावधीत अनेकजण पर्यटनला पसंत देतात. निसर्गप्रेमी आणि ट्रेकर्ससाठी वासोटा किल्ल्याला पहिली पसंती दिली जाते. मात्र, ३० डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत या किल्ल्यावर येण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. याबाबतची माहिती वनक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी विजय बाठे यांनी दिली.
तसेच वासोटा किल्ला आणि परिसरात कोणीही बेकादेशीरपणे आढळून आल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देखील वनविभागकडून देण्यात आला आहे. सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागात कोयना अभयारण्य आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या सानिध्यात वासोटा किल्ला वसलेला आहे. सुट्टीच्या कालावधीत मोठ्या प्रमाणावर या किल्ल्यावर आणि आजूबाजच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यटकांची मांदियाळी पाहिला मिळते. ३० डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी किल्ल्यावर होऊ शकते. यामुळे किल्ल्यावर असलेल्या निसर्गसंपदेला कोणतीही हानी पोहचू नये, त्यामुळे या काळात किल्ल्यावर पर्यटकांसाठी बंदी घालण्यात आली आहे.
….अन्यथा कारवाईचा इशारा
सुरक्षेच्या दुष्टीने वासोटा किल्ल्यावर ३० डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. या काळात वासोटा किल्ला तसेच अभयारण्य परिसरात कोणीही बेकायदेशीरीत्या आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येई, असा इशारा वनविभागाकडून देण्यात आला आहे.





