Vasant More : मनसे पक्षाला रामराम ठोकल्यानंतर वसंत मोरे यांनी वंचित बहुनज आघाडीच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढविली. मात्र यात त्यांचा पराभव झाला. यानंतर त्यांनी काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यानंतर दि. ९ जुलै २०२४ रोजी वसंत मोरे यांनी जाहीररित्या उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला. वसंत मोरे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. मराठी माणसाच्या हक्काचा विषय असो वा एखाद्याला मदत करणं असो मोरे आपली प्रत्येक अपडेट सोशल मीडियावरून देत असतात. सोशल मीडियावर देखील त्यांचा मोठा चाहता वर्ग असून, त्यांची प्रत्येक पोस्ट नेहमीच ते चर्चेत असते. त्यांचे चाहते आणि कार्यकर्ते त्यांच्या सर्वच पोस्टला भरभरून प्रेम देतात. दरम्यान, अश्यातच वसंत मोरे यांच्या एका व्यक्तव्याने चांगलंच लक्ष वेधून घेतलं आहे. नुकतंच त्यांनी एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेला मुलाखत दिली असून, यावेळी त्यांनी अनेक खुलासे केले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मिम्सवर देखील त्यांनी परखड भाष्य केलं आहे. सोशल मीडियावर माझे फॉलोअर्स वाढले : “मी तर असं बोलतो की, शिवसेनेत आल्यावर माझे सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढले. मी जेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत होतो तेव्हा माझ्या पेजवर 500K फॉलोअर्स होते, आणि ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर माझे 605K फॉलोअर्स झाले आहेत”. असं त्यांनी सांगितलं. मी या दोन्ही नेत्यानं सोबत काम केलं : ठाकरे बंधुंच्या युतीसंदर्भात बोलताना वसंत मोरे म्हणाले की, “गेले चार-पाच दिवस अगोदर सुरुवातीला जेव्हा या घटना चालू होत्या तेव्हा मी म्हणालो होतो या सर्व प्रकरणात मला सर्वाधिक आनंद होईल. आणि सुरुवातीला मी शिवसेना आणि नंतर मनसे आणि आता पुन्हा शिवसेना. त्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. मी या दोन्ही नेत्यानं सोबत काम केलं आहे”. असं देखील वसंत मोरे यावेळी म्हणाले.