Varun Dhawan : वरुण धवन पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर; मेट्रोमधील व्हिडिओ व्हायरल
Varun Dhawan : वरुण धवनने मेट्रो प्रवासादरम्यान नियमांचे उल्लंघन केल्याने त्याला सोशल मिडियावर ट्रोल केले जात आहे.

Varun Dhawan : अभिनेता वरुण धवनचा मेट्रोमधील एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. एका चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वरुणने नुकताच मुंबई मेट्रोमधून प्रवास केला. यावेळी तो मेट्रो गाडीत हॅन्डला लटकताना, स्टंट करताना दिसला. त्याने प्रवासादरम्यान नियमांचे उल्लंघन केल्याने त्याला सोशल मिडियावर ट्रोल केले जात आहे.
वरुण धवनचा बाॅर्डर २ सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. याच सिनेमाच्या प्रमोशनाठी दोन-तीन दिवसांपूर्वी एका चित्रपटगृहात पोहचण्यासाठी त्याने मेट्रोचा पर्याय स्वीकारला. मेट्रोमधून प्रवास करताना त्याने प्रवाशांशी संवाद साधला. तर तो मेट्रो गाडीत स्टंट करतानाही दिसला. मेट्रो गाडीतील हॅन्डलला लटकतानाचा त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
मेट्रोत गाडीत लटकतानाच्या वरुण धवनच्या व्हिडिओची गंभीर दखल एमएमआरडीएने घेतली आहे. मेट्रोदरम्यान नियमांचे उल्लंघन झाल्याबद्दल नाराजी व्यक्त करत एमएमआरडीएने एक्सवर एक पोस्ट टाकली आहे. मेट्रो गाडीतील हँडल लटकण्यासाठी नाहीत. अशी कृत्य मेट्रो रेल्वे अधिनियम २००२ मध्ये दिलेल्या सार्वजनिक उपद्रव आणि मालमत्तेचे नुकसान करण्याशी संबंधित आहे.
हा दंडनीय गुन्हा असून यात तुरुंगवासाची शिक्षाही होऊ शकते. कोणीही मेट्रो प्रवासादरम्यान अशी कृत्ये करु नये, असे आवाहनही या पोस्टद्वारे करण्यात आले आहे. Varun Dhawan :
View this post on Instagram
वरुण आणि कियारा मेट्रोत वडापाव खाताना दिसले
याआधी वरुण धवन आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांनी २०२५ मध्ये आपल्या ‘जुग जुग जिओ’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुंबई मेट्रोमधून प्रवास केला होता. यावेळी ते दोघेही मेट्रोत वडापाव खाताना दिसले होते. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वरुण आणि कियारा दोघेही टोलर्सच्या निशाण्यावर आले होते.
Rupali Chakankar : “…तर दीप्ती वाचली असती”; आयोगावर महिलांचा संताप, रुपाली चाकणकर म्हणाल्या…
मेट्रो गाडीत काहीही खाण्यास सक्त मनाई असताना सेलिब्रिटींना वडापाव खाण्यास मुभा आहे का? असा प्रश्न उपस्थित केला होता. मात्र या घटनेनंतर आता वरुण धवन पुन्हा एकदा मेट्रोमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. Varun Dhawan :
हेही वाचा:





