वरुण धवन आणि ॲटली ‘बेबी जॉन’च्या रिलीजपूर्वी पोहचले महाकालेश्वर मंदिरात

Varun Dhawan | बॉलिवूड अभिनेता वरुण धवनचा आगामी चित्रपट ‘बेबी जॉन’ ख्रिसमसच्या मुहूर्तावर 25 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. सध्या वरुण त्याच्या टीमसह चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधी वरुणने उज्जैनमधील प्रसिद्ध महाकालेश्वर मंदिराला भेट दिली.
यावेळी त्यांनी ‘बेबी जॉन’ सिनेमाच्या यशासाठी प्रार्थना केली. एएनआयने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये, वरुणसोबत चित्रपटाचे दिग्दर्शक ॲटली, त्याची पत्नी प्रिया आणि चित्रपटाची मुख्य अभिनेत्री कीर्ती सुरेश देखील उपस्थित होते. वरुण आणि ॲटली दोघेही दर्शनासाठी पांढरा कुर्ता-पायजमा घालून मंदिरात पोहोचले होते. यावेळी प्रिया आणि कीर्ती सुरेश पारंपरिक लूकमध्ये पाहायला मिळाल्या.
#WATCH | Madhya Pradesh: Actor Varun Dhawan offers prayers at Mahakaleshwar Temple in Ujjain. pic.twitter.com/zslPBQ57sP
— ANI (@ANI) December 24, 2024
‘बेबी जॉन’बद्दल बोलायचे झाले तर, हा तमिळ चित्रपटाचा रिमेक आहे, ज्यामध्ये सुपरस्टार विजय दिसला होता. ‘बेबी जॉन’ चित्रपटात वरूण धवनसोबत कीर्ती सुरेश, सान्या मल्होत्रा, जॅकी श्रॉफ, वामिका गब्बी हे कलाकार दिसणार आहे. या चित्रपटात सलमान खानचा कॅमिओ देखील दिसणार आहे. Varun Dhawan |
ट्रेलरमध्ये त्याची एक छोटीशी झलकही पाहायला मिळाली होती, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये आणखीनच उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटात वरुण एका नव्या आणि वेगळ्या अंदाजात दिसणार आहे, ही त्याच्या चाहत्यांसाठी खूप आनंदाची बाब आहे. Varun Dhawan |
ख्रिसमसच्या मुहूर्तावर होणार प्रदर्शित
‘बेबी जॉन’ चित्रपट ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित होऊन बॉक्स ऑफिसवर खळबळ माजवण्यासाठी सज्ज होणारआहे. हा चित्रपट चांगलाच हिट ठरेल, अशी चाहत्यांना आशा आहे. 25 डिसेंबर हा सुट्टीचा दिवस असल्याने हा चित्रपट चांगली कमाई करण्याची शक्यता आहे. Varun Dhawan |
हेही वाचा:





