Varun Chakravarthy Injured : दुसऱ्या टी-२० सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडू पुन्हा जायबंदी; आशियाई स्पर्धेत खेळण्यावरही टांगती तलवार
Varun Chakravarthy Injured : अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यापूर्वी टीम इंडियासाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे.

Varun Chakravarthy Injured Ruled Out Of Afghanistan T20 Series Asian Games Participation In Doubt : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या आंतरराष्ट्रीय टी-२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतल्यानंतर टीम इंडियाच्या गोटातून एक अत्यंत चिंताजनक बातमी समोर आली आहे. मंगळवारी, १५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या दुसऱ्या टी-२० सामन्यापूर्वी भारताचा प्रमुख मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) दुखापतग्रस्त झाला आहे. पहिल्या सामन्यात गोलंदाजी करतानाच त्याला ही दुखापत झाल्याचे समोर आले असून, तो उर्वरित दोन्ही सामन्यांमधून बाहेर पडण्याची दाट शक्यता आहे. अद्याप ‘बीसीसीआय’ने (BCCI) यावर कोणतेही अधिकृत वैद्यकीय निवेदन जारी केलेले नाही.
पुनरागमनाच्या पहिल्याच सामन्यात दुखापत; १७ सप्टेंबरच्या मॅचलाही मुकणार?
दीर्घ काळानंतर संघात पुनरागमन करणाऱ्या वरुणने पहिल्या सामन्यात अप्रतिम गोलंदाजी करत ४ षटकांत अवघ्या १६ धावा देऊन १ महत्त्वपूर्ण विकेट्स मिळवली होती. मात्र, सामन्यादरम्यानच त्याला दुखापत झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. वरुण १५ सप्टेंबरचा दुसरा सामना खेळू शकणार नाही. याशिवाय १७ सप्टेंबर रोजी दिल्लीतच होणाऱ्या तिसऱ्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यालाही तो मुकण्याची शक्यता असल्याने भारतीय संघ व्यवस्थापनाची डोकेदुखी वाढली आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेतील सहभागावर प्रश्नचिन्ह; भारताचे टेन्शन वाढले!
🩹 Rehab: Cleared after 2 months at CoE following an injury in England.
🏏 Comeback: Bowled a brilliant 1/16 (4 overs) vs Afghanistan in the 1st T20I.
⚠️ Relapse: Suffered an immediate injury breakdown right after the match.
❌ Out: Ruled out of the series, putting CoE… pic.twitter.com/kh725SAEKI
— CREX (@Crex_live) September 14, 202
अफगाणिस्तानविरुद्धच्या या घरच्या मालिकेनंतर भारतीय संघ जपानमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये सहभागी होणार आहे. जर वरुण चक्रवर्तीची दुखापत गंभीर स्वरूपाची असेल, तर तो या अत्यंत महत्त्वाच्या स्पर्धेतूनही बाहेर होऊ शकतो. मधल्या षटकांमध्ये प्रतिस्पर्धी संघावर अंकुश ठेवणारा आणि भारताचा प्रमुख ‘विकेटटेकर’ गोलंदाज बाहेर पडणे हा आशियाई मोहिमेआधी मोठा धक्का मानला जात आहे.
सेंटर ऑफ एक्सलन्सच्या (CoE) कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह; खेळाडू पुन्हा पुन्हा जायबंदी!
जुलै महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर असताना वरुण गंभीर दुखापतग्रस्त झाला होता. सुमारे तीन महिने ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’मध्ये (CoE) फिटनेस सिद्ध केल्यानंतर तो संघात परतला होता. मात्र, पुनरागमनाचा अवघा एक सामना खेळून तो पुन्हा जखमी झाल्याने बीसीसीआयच्या वैद्यकीय आणि फिटनेस यंत्रणेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. खेळाडू पूर्णपणे तंदुरुस्त नसताना त्यांना मैदानावर उतरण्याची परवानगी कशी मिळते, यावर आता चर्चा सुरू झाली आहे.





