विधानसभा निवडणुकीपूर्वी मुंबई काँग्रेसमध्ये कलह? ; वर्षा गायकवाड यांना ‘या’ पदावरून हटवण्याची मागणी

Varsha Gaikwad । महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी आता केवळ काही महिने शिल्लक राहिले आहेत. या निवडणुकीसाठी सर्व पक्ष जोमाने तयारी करत आहेत. मात्र निवडणुकी अगोदरच आता काँग्रेसमध्ये मतभेद निर्माण होताना दिसून येत आहेत. लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करूनही मुंबई काँग्रेसमध्ये सर्व काही आलबेल असल्याचे चित्र नाही. पक्षाच्या जवळपास 16 वरिष्ठ नेत्यांनी वर्षा गायकवाड यांना मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी केली आहे. यावर्षी ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी संघटना मजबूत करण्यासाठी वर्षा गायकवाड यांची बदली करावी, असे मुंबई काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे.
प्राप्त माहितीनुसार, वर्षा गायकवाड नुकतेच मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत, त्यामुळे त्यांना संघटनात्मक पातळीवर काम करण्यास वेळ मिळणार नाही असे य नेत्याने म्हणणे आहे. तसेच त्यांच्या कार्यशैलीवरही काही नेत्यांनी आक्षेप घेतला आहे.
16 नेत्यांचे काँग्रेस हायकमांडला पत्र Varsha Gaikwad ।
एका वृत्त संस्थेच्या वृत्तानुसार,16 जून रोजी लिहिलेल्या पत्रात या नेत्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी आणि प्रलंबित मुंबई नागरी निवडणुकांपूर्वी मुंबईतील पक्षाच्या पुनरुज्जीवनावर चर्चा करण्यासाठी काँग्रेस नेतृत्वाकडे वेळ मागितला आहे. या पत्रावर राज्यसभा खासदार आणि काँग्रेस कार्यकारिणी सदस्य चंद्रकांत हंडोरे, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष जनार्दन चांदूरकर आणि भाई जगताप, ज्येष्ठ नेते नसीम खान, सुरेश शेट्टी, मधु चव्हाण, चरणसिंग सप्रा, झाकीर अहमद आणि महाराष्ट्र काँग्रेसचे कोषाध्यक्ष अमरजीत यांचा समावेश आहे समाविष्ट आहेत.
वर्षा गायकवाड यांच्या विरोधात नाराजी Varsha Gaikwad ।
यातील बहुतांश नेते काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, केसी वेणुगोपाल आणि राहुल गांधी यांची भेट घेऊन शहरात पक्ष कसा मजबूत करायचा यावर चर्चा करण्यासाठी दिल्लीत पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. आज महाराष्ट्राशी संबंधित बैठक होणार आहे. यूजीसी-नेट पेपर लीक प्रकरणासंदर्भात नुकत्याच झालेल्या आंदोलनात गायकवाड यांनी पक्षाच्या सर्व नेत्यांना शहर युनिट कार्यालयात बोलावले नाही, त्यामुळे त्यांना उपनगरात वेगळे आंदोलन करावे लागले. त्यासोबतच गायकवाड यांना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष बनून जवळपास 13 महिने झाले आहेत, परंतु त्यांनी पक्ष केडरला प्रेरित करण्यासाठी कोणतेही महत्त्वपूर्ण कार्य केलेले नाही. मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार भूषण पाटील यांनीही निवडणुकीत मुंबई काँग्रेसकडून आपल्याला कोणतीही मदत मिळाली नसल्याचा दावा केलाय.





