ब्रिजमोहनलाल मुंजाल यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हिरो मोटोकॉर्पच्या विविध योजना

सातारा – हिरो मोटोकॉर्पचे संस्थापक-चेअरमन, पद्मश्री डॉ. ब्रिजमोहनलाल मुंजाल यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हिरो मोटोकॉर्पकडून ग्राहकांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. या सर्व योजना सातारा येथील सम्राट हिरोमध्ये उपलब्ध आहेत.
डॉ. ब्रिजमोहनलाल मुंजाल आणि त्यांच्या भावंडांनी सुरुवातीला सायकलचे सुटे पार्ट बनवण्याचा कारखाना सुरू केला. त्यात मिळालेल्या यशाने प्रेरित होऊन पुढे हिरो सायकलची स्थापना केली. जगातील नंबर एकची सायकल, अशी हिरो सायकलची बाजारपेठेत ओळख निर्माण झाली. ब्रिजमोहनलाल मुंजाल यांनी 1984 साली जपानच्या होंडा कंपनीशी करार करून, हिरो होंडा या मोटारसायकल कंपनीची स्थापना हरियाणामधील धारुहेरा येथे केली. या कंपनीने सीडी100 ही पहिली मोटारसायकल भारतीय बाजारपेठेत दाखल केली. ही कंपनी मुंजाल यांनी सहकारी व कर्मचार्यांच्या सहकार्याने अल्पावधीतच यशोशिखरावर नेली.
गुरगाव (गुरुग्राम), हरिद्वार, निमराणा या ठिकाणच्या प्लँटमधून संपूर्ण देशात हिरो दुचाकींचा पुरवठा करण्यासाठी उच्च तंत्रज्ञान वापरून, 1994 साली जगातील नंबर एक असलेल्या स्प्लेंडर प्लसची निर्मिती केली गेली. तेव्हापासून कंपनीने वर्षानुवर्षे विक्रीचे अनेक विक्रम प्रस्थापित केले. सलग 23 वर्षांपासून जगातील नंबर एकची दुचाकी कंपनी, असे मानांकन हिरो मोटोकॉर्पला मिळाले आहे. डॉ. मुंजाल यांची स्मरणशक्ती विलक्षण होती. एक हजाराहून जास्त वितरकांना नावाने ओळखणारे ते एकमेव व्यक्तिमत्व होते.
डॉ. मुंजाल यांचा जन्म 1 जुलै 1923 रोजी झाला. त्यांचे जन्मशताब्दी वर्ष 1 जुलै 2024 पासून हिरो परिवाराकडून साजरे होत आहे. यानिमित्त हिरो मोटोकॉर्प ग्राहकांसाठी अनेक योजना राबवत आहे. या जन्मशताब्दी वर्षात सलग 100 दिवस दररोज एक ग्राहकाला स्क्रॅच कूपनद्वारे 100 टक्के कॅशबॅक ऑफर, 250 रुपयांचे सर्व्हिस व्हाऊचर, फ्री वॉशिंग, फ्री पॉलिश, फक्त 199 रुपयांमध्ये पेड सर्व्हिस, गुडलाइफ जॉइनिंग डबल बोनस पॉइंट इत्यादी योजना 100 दिवस चालवल्या जाणार असल्याचे सम्राट मोटर्सतर्फे सांगण्यात आले. डॉ. ब्रिजमोहनलाल मुंजाल यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सम्राट हिरोचे मालक सतीश त्यागी, कुशल त्यागी, सर्व स्टाफ आणि एहसास गतिमंद वसतिगृहातील मुलांसोबत केक कापून सेलेब्रेशनची सुरुवात करण्यात आली. या जन्मशताब्दी योजनेचा लाभ ग्राहकांनी घ्यावा, असे आवाहन सम्राट मोटर्सतर्फे करण्यात आले आहे.





