satara | हिंदवी नवरात्रौत्सव मंडळातर्फे म्हासुर्णे येथे विविध कार्यक्रम

म्हासुर्णे, (प्रतिनिधी) – म्हासुर्णे, ता. खटाव येथी हिंदवी नवरात्रौत्सव मंडळाने दुर्गामाता उत्सवात विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याची माहिती पदाधिकार्यांनी दिली.
हिंदवी नवरात्रौत्सव मंडळाने दि. 3 ऑक्टोबर रोजी देवीच्या मुर्तीची मनोभावे स्थापना केली असून सकाळी व संध्याकाळी देवीची आरती भाविकांच्या उपस्थितीत होत आहे.
दररोज संध्याकाळी देवीच्या समोर रास दांडिया खेळाचे आयोजन केले असून महिला, मुली, मुले मोठ्या संख्येने उपस्थित राहुन दांडियाचा आनंद घेत आहेत.
यावर्षी दररोज लहान मुले व मुली तसेच महिलाांसाठी फनीगेम्स आयोजित केल असून यामध्ये पैठणी, स्कूल बॅग, जेवनाचा डबा, स्टडी टेबल, पाणी जार असे अनेक बक्षिसे विजेत्यास दिले जाणार आहेत.महिलांसाठी दि. 12 ऑक्टोबर रोजी सिने अभिनेते व निवेदक दीपक साबळे प्रस्तुत होम मिनिस्टर होणार आहे.
या कार्यक्रमात आकर्षक बक्षिसे दिली जाणार असून प्रथम क्रमांकास फ्रीज, द्वितीय सोफा सेट, तृतीय टीव्ही, चतुर्थ ऐअर फायर, पाचव्या क्रमाकांस ड्रेसिंग टेबल, सहावा मिक्सर, सातवा वन ग्राम गोल्ड, आठवा स्टँड फॅन व नवव्या क्रमांकास टेबल फॅन बक्षीस देण्यात येणार आहे.महिला, मुले, मुले यांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.



