satara | हजारो भाविकांच्या उपस्थितीत म्हासुर्णेत रथोत्सव

म्हासुर्णे (प्रतिनिधी) – म्हासुर्णे (ता. खटाव) येथील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जागृत देवस्थान श्री भैरवनाथाची यात्रा गुलाल खोबऱ्याची उधळण करून सासनकाठ्या नाचवून श्री भैरवनाथाच्या नावानं चांगभलं’च्या गजरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
आजच्या दिवशी यात्रेचा मुख्य दिवस असली जाते. त्याचबरोबर मंदिराच्या गाभाऱ्यास फुलांची आरास करण्यात आली होती.तो, यादिवशी देवाची विधिवत पूजा करून पोशाख बांधण्यात येतो. देवाची रथामधून मिरवणूक काढली जाते. भाविक लाखो रुपयांची देणगी रथावर भाविकांकडून अर्पण के
सकाळी देवाची आरती करून देवाची पालखी मंदिराबाहेर आल्यानंतर या सोहळ्यामध्ये परिसरातील नवसाच्या सासनकाठ्या दाखल झालेल्या असतात. या सोहळ्यात प्रचंड गुलाल खोबऱ्याची उधळण करण्यात आली. यामध्ये हजारो भाविकांसह गावकरी व मुंबईकर मंडळी यात्रेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मंदिर परिसरात मिठाई दुकाने, आकाश पाळण्यामुळे यात्रा परिसर गजबजलेला होता. श्री भैरवनाथ पालखी मिरवणुकीत पुजारी व देवाचे मानकरी सहभागी झाले होते. मिरवणुकीत लेझीम, गजी, सनई, बँड, घोडा, देवाचा मानदंड होता.
तर युवकवर्ग सासनकाठ्या नाचवण्यात दंग झाले होते. भैरवनाथाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषात गुलालाची उधळण करण्यात आल्याने अवघा आसमंत गुलालमय झाला होता. सासनकाठ्या ग्राम प्रदक्षिणेसाठी रवाना झालेल्या असतात. भाविकांनी गुलाल, खोबऱ्याची उधळण आणि भैरवनाथाचा गजर केला.
मंदिरात दर्शनासाठी भक्तांची गर्दी
सकाळपासून म्हासुर्णेसह, चोराडे, रहाटणी, वांझोळी, शेनवडी, वडगाव, उंचीठाणे, या पंचक्रोशीतील ग्रामस्थ व भाविकांनी श्री भैरवनाथाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. या सोहळ्यात प्रचंड गुलाल खोबऱ्याची उधळण करण्यात आली. भाविकांनी रथावर नारळ व नोटांची तोरणे अर्पण केली. यात्रेत तमाशा, कुस्त्या, ऑर्केस्ट्रा आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.





