Airport Firing : शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार; दोन जण जखमी
Airport Firing : वाराणसी विमानतळावर मुंबईला जाणाऱ्या शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाच्या पिस्तुलातून अचानक २ गोळ्या सुटल्या. या अपघातात २ सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत.

Airport Firing : शिदेंसेनाच्या माजी नगरसेवक कमलेश राय यांनी वाराणसी विमानतळावर त्यांच्या बंदुकीतून दोन राउंड फायर केल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात दोन सुरक्षा तपासणी कर्मचारी गंभीर जखमी झाले असून, रोहित राज आणि सुमन कुमारी अशी त्यांची नावे आहेत. (Airport Firing)
मिळालेल्या माहितीनुसार, कमलेश राय आणि त्यांची पत्नी वाराणसी विमानतळामधून मुंबईसाठी निघाले होते. यावेळी वाराणसी विमानतळावर परवानाधारक पिस्तुल तपासणीदरम्यान कमलेश राय यांच्याकडून गोळी सुटल्याची माहिती आहे. (Airport Firing)
वाराणसी एअरपोर्टवर बंदूक लॉक करत असताना राय यांच्या बंदुकीतून दोन राउंड फायरिंग झाले आहेत. वाराणसी एअरपोर्ट परिसरात गोळीबार झाल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचा वातावरण निर्माण झाले. एअरपोर्ट सुरक्षा रक्षकाने कमलेश रायला ताब्यात घेऊन चौकशी करत आहेत. ( Airport Firing)

कमलेश राय यांच्याकडे 7.62 मिमी पिस्तुल होते. पिस्तुलासोबत 21 जिवंत काडतुसे असल्याची माहिती आहे. एअर इंडियाच्या विमानाने ते मुंबईला जाणार होते. सकाळी सुमारे साडेनऊ वाजता शस्त्र तपासणीदरम्यान ही घटना घडली. (Airport Firing)
दोन्ही जखमींना तातडीने न्यू लक्ष्मी ट्रॉमा सेंटरमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले आहे. स्थानिक पोलिसांना तत्काळ या घटनेची माहिती देखील देण्यात आली. यानंतर रायला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Airport Firing)
Thailand Firing : थायलंडच्या शाळेत अंदाधुंद गोळीबार ; शिक्षकासह 7 जण ठार, 20 विद्यार्थी जखमी





