वाणी कपूर स्कॉटलॅंडला दाखल

बॉलीवूड अभिनेत्री वाणी कपूर ही आपल्या आगामी “बेलबॉटम’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी स्कॉटलॅंडला दाखल झाली आहे. यात तिच्यासोबत अक्षयकुमार मुख्य नायकाची भूमिका साकारत आहे. लॉकडाऊननंतर पुन्हा सेटवर वापसी करण्यासाठी ती खूपच उत्साहित आहे.
वाणी म्हणाली, मला विश्वास होत नाही की मी एका चित्रपटासाठी शूटिंग करणार आहे. सेटवर पुन्हा परतणे हा असा क्षण आहे, ज्याचा मी खूप मनःपूर्वक वाट पाहात होते आणि अखेर तो क्षण आला आहे. मी तब्बल 5 महिन्यांनंतर मुंबईबाहेर जात आहे.
लॉकडाऊननंतर पुन्हा एकदा चित्रपटसृष्टी हळूहळू मार्गावर येत असल्याने वाणी कपूरने आनंद व्यक्त केला आहे. ती म्हणाली, हे वर्ष आपण सर्वांसाठी एका कठीण परीक्षासारखे राहिले आहे; परंतु मला आनंद होत आहे की, आता सर्व गोष्टी हळूहळू सुरू होत आहेत. या परिस्थितीशी आता सर्वांनी जुळवून घेणे आवश्यक बनले आहे.
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास वाणीकडे “बेलबॉटम’ शिवाय अन्य दोन चित्रपट आहे. यातील “शमशेरा’मध्ये रणबीर कपूर आणि संजय दत्त मुख्य भूमिका साकारत आहे. तर दुसरा चित्रपटात ती आयुष्मान खुरानासोबत झळकणार आहे. मात्र, अद्याप चित्रपटाचे नाव निश्चित करण्यात आलेले नाही.





