पुणे पालिका पोटनिवडणूक आखाड्यात वंचित आघाडीची उडी
Updated On:

पुणे – लोकसभा निवडणुकीत 65 हजार मते मिळवून तिसऱ्या स्थानावर राहिलेल्या वंचित विकास आघाडीने महापालिका पोटनिवडणुकीतही उडी घेतली आहे. प्रभाग क्रमांक 1 मधून रोहिणी टेकाळे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
पुणे महापालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार भारीपचे शहराध्यक्ष आणि वंचितचे पुणे शहर समनव्यक अतुल बहुले यांनी रोहिणी टेकाळे यांची उमेदवारी जाहीर केली आहे.
प्रभाग क्रमांक 1 मध्ये विश्रांतवाडी-कळस-धानोरी हा भाग येत असून हा भाग आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला समजला जातो. त्यामुळे वंचित आघाडीने या जागेवर विजय मिळून महापालिकेत प्रवेश करण्याचा चंग बांधला आहे. त्यामुळे या निवडणुकीत वंचित फॅक्टर कोणाच्या पथ्यावर पडणार हे पाहावे लागेल.





