वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; 30 जणांना दिली उमेदवारी

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर सर्व राजकीय पक्षांनी तयारीला जोरदार सुरुवात केली आहे. यंदाची विधानसभा निवडणूक एका टप्यात होणार आहे. 20 नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार आहे तर 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे.
महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावर चर्चांवर चर्चा आणि बैठकांवर बैठका होत असताना वंचित बहुजन आघाडीने बाजी मारत आपली 30 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे.
The Vanchit Bahujan Aaghadi is pleased to declare its third list of candidates for the Maharashtra Assembly elections. #MaharashtraAssembly2024 #VoteForVBA #VoteForGasCylinder pic.twitter.com/kblZxhymY3
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) October 16, 2024
या अगोदर 21 सप्टेंबर रोजी 11 उमेदवारांची तर 9 ऑक्टोबर रोजी दहा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली होती. आजच्या 30 उमेदवारांसह आतापर्यंत वंचित बहुजन आघाडी कडून तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. आतापर्यंत 51 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.
कोणाला दिली उमेदवारी?
जालना येथून डेव्हिड धुमारे, बदनापुर येथे सतीश खरात, देवळाली अविनाश शिंदे, इगतपुरी येथे भाऊराव काशिनाथ डगळे, उल्हासनगर येथे डॉ. संजय गुप्ता, अणुशक्ती नगर येथे सतीश राजगुरू, वरळीत अमोल आनंद निकाळजे, पेणमध्ये देवेंद्र कोळी, आंबेगाव मतदारसंघात दिपक पंचमुख, संगमनेर येथे अझीज अब्दुल व्होरा, राहुरी येथे अनिल भिकाजी जाधव, माजलगाव मतदारसंघातून शेख मंजूर चांद, लातुर शहर मतदारसंघातून विनोद खटके, तुळजापूर येथे डॉ. स्नेहा सोनकाटे, उस्मानाबाद येथे प्रणित शामराव डिकले, परंडा मतदारसंघात प्रविण रणबागुल, अक्कलकोट येथे संतोषकुमार खंडू इंगळे, माळशिरसमध्ये राज यशवंत कुमार आणि मिरज मतदारसंघात विज्ञान प्रकाश माने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.





