Vanchit Bahujaj Aghadi : वंचित बहुजन आघाडीची 16 जणांची चौथी यादी जाहीर!

मुंबई : महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून घामासन सुरू आहे. तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीने बाजी मारत उमेदवार जाहीर करण्यात चांगलीच ‘आघाडी’ घेतली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज 16 जणांची चौथी यादी जाहीर केली आहे.
विशेष म्हणजे यामध्ये कराड दक्षिणमधूनही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरुद्ध वंचित आघाडीचा उमेदवार ठरला आहे. कराड दक्षिणमधून वंचित बहुजन आघाडीकडून संजय कोंडीबा गाडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
The Vanchit Bahujan Aaghadi is pleased to declare its fourth list of candidates for the Maharashtra Assembly elections. #MaharashtraAssembly2024 #VoteForVBA #VoteForGasCylinder pic.twitter.com/vHVaj6p6PR
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) October 19, 2024
चौथ्या यादीमध्ये शहदा, साक्री, तुमसर, अर्जुनी मोरगाव, हादगाव, भोकर, कळमनुरी, सिल्लोड, कन्नड, औरंगाबाद पश्चिम, पैठण, महाड, गेवराई, आष्टी, कोरेगाव, कराड दक्षिण या मतदार संघातून उमेदवार जाहीर करण्यात आले आहे.





