“राज ठाकरेंचा भोंगा उतरवण्याचे काम वंचित आघाडी करेल”; सुजात आंबेडकरांचे विधान

Sujat Ambedkar On Raj Thackeray| विधानसभा निवडणूकीच्या तारखा एकीकडे जाहीर झाल्या आहेत, मात्र अद्यापही महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जागा वाटपाबाबत चर्चा चालू आहे. तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी पक्षाने देखील जोरदार तयारी केली आहे.
वंचितकडून काही उमेदवारांच्या नावाची घोषणा देखील करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने वंचितने आपल्या प्रचाराला देखील सुरुवात केली आहे. याचदरम्यान वाशिमध्ये एका प्रचारसभेत बोलताना सुजात आंबेडकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
सुजात आंबेडकर काय म्हणाले?
विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या वंचितच्या उमेदवार मेघा डोंगरे यांच्या प्रचारासाठी सुजात आंबेडकर हे वाशिममध्ये आले होते. यावेळी सुजात आंबेडकर म्हणाले की, “मोठ्या स्पीकरवर, भोंग्यांवर हनुमान चालिसा लावले तर त्याला विरोध करण्याचं काम तसेच राज ठाकरे यांचा भोंगा उतरवण्याचं काम वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते करतील. जोपर्यंत पाच ते सहा मुस्लीम उमेदवार निवडून येणार नाहीत, तोपर्यंत मुस्लीम समाजाचं भलं कोणीही करू शकत नाही.”
यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर देखील निशाणा साधला. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे प्रस्थापित नेते आपला विकास करू शकत नाही. महाराष्ट्रात मुस्लिमांची संख्या 15 टक्के आहे. जो पक्ष आम्हाला 15 टक्के भागिदारी देईल, 15 टक्के उमेदवारी देईल, त्यालाच मुस्लीम समाज मतदान करेल. मुस्लिमांसाठी फक्त वंचित बहुजन आघाडी लढते, असे म्हणत आपल्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. Sujat Ambedkar On Raj Thackeray|
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने ‘एकला चलो रे ‘ची भूमिका घेतली आहे. वंचितने आपल्या उमेदवारांच्या आतापर्यंत तीन याद्या जाहीर केल्या आहेत. लोकसभा निवडणुकीतही वंचितने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. Sujat Ambedkar On Raj Thackeray|
हेही वाचा:
मोठी बातमी ! बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात पाकिस्तान कनेक्शन? ; सीमेपलीकडून शस्त्रे आल्याचा दावा




