Vaibhav Suryavanshi break Babar Azam record : भारताचा उदयोन्मुख तारा वैभव सूर्यवंशीने क्रिकेट विश्वात आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझमला मागे टाकत 16 किंवा त्यापेक्षा कमी वयात यूथ वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू होण्याचा मान मिळवला आहे. ऑस्ट्रेलिया अंडर-19 संघाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात 16 धावांची खेळी करत वैभवने हा पराक्रम केला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत दमदार कामगिरी – शुक्रवारी झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात भारताची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार आयुष म्हात्रे अवघ्या 4 धावांवर बाद झाला, तर वैभव सूर्यवंशी 16 धावांवर बाद झाला. तरीही, या सामन्यात वैभवने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याने 38 धावा, तर दुसऱ्या सामन्यात 70 धावांची खेळी करत भारताला विजय मिळवून दिला होता. यूथ वनडेमध्ये वैभवचे दमदार प्रदर्शन – वैभव सूर्यवंशीने यूथ वनडेमध्ये आतापर्यंत 11 डावांमध्ये 50.64 च्या सरासरीने 556 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे, त्याने यूथ वनडेमध्ये तब्बल 43 षटकार ठोकले आहेत, जो या प्रकारातील एका खेळाडूने मारलेल्या सर्वाधिक षटकारांचा विक्रम आहे. यासह त्याने भारताचा माजी खेळाडू उन्मुक्त चंद याचा 38 षटकारांचा विक्रम मोडला. हेही वाचा – Sheetal Devi : हात नसतानाही शीतल देवीने रचला इतिहास, विश्व चॅम्पियनशिपमध्ये पटकावलं सुवर्णपदक! 16 किंवा त्यापेक्षा कमी वयात यूथ वनडेमधील सर्वाधिक धावा करणारे खेळाडू : हसन रझा (पाकिस्तान) – 727 धावा वैभव सूर्यवंशी (भारत) – 556 धावा बाबर आझम (पाकिस्तान) – 552 धावा नजमुल हुसेन शान्तो – 546 धावा अहमद शहझाद – 510 धावा हेही वाचा – IND vs SL : रनआऊट असूनही कामिंदू मेंडिसला OUT का दिलं नाही? काय आहे ICC चा नियम? जाणून घ्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध अर्धशतकासह आणखी एक विक्रम – वैभव सूर्यवंशीने ऑस्ट्रेलिया अंडर-19 संघाविरुद्ध यूथ वनडेमध्ये अर्धशतक झळकावणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू होण्याचा मान मिळवला आहे. हसन रझाचा हा विक्रम मोडत, अवघ्या 14 वर्षे आणि 181 दिवसांच्या वयात वैभवने हा पराक्रम केला. यासह, यूथ वनडेमध्ये सर्वात कमी वयात चार अर्धशतके करणारा खेळाडू होण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे.