Vaibhav Siraj Video : वैभव सूर्यवंशीने सिराजची केली धुलाई! दुलीप ट्रॉफीच्या फायनलमध्ये एकाच षटकात दाखवले तारे, पाहा VIDEO
Vaibhav Siraj Video : दुलीप ट्रॉफीच्या फायनल सामन्यात वैभव सूर्यवंशीने वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजची धुलाई केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Vaibhav Sooryavanshi Hits Mohammed Siraj Duleep Trophy 2026 Final East Zone vs South Zone : चेन्नईच्या ऐतिहासिक एम. ए. चिदंबरम (चेपॉक) स्टेडियमवर दुलीप ट्रॉफी २०२६ (Duleep Trophy 2026) चा फायनल सामना ईस्ट झोन आणि साऊथ झोन यांच्यात सुरू झाला आहे. नाणेफेक जिंकून ईस्ट झोनचा कर्णधार इशान किशनने प्रथम फलंदाजीचा घेतलेला निर्णय सलामी जोडीने सार्थ ठरवला. अभिमन्यू ईश्वरन आणि १५ वर्षीय युवा वैभव सूर्यवंशी (Vaibhav Sooryavanshi) यांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचली. सर्वांचे लक्ष लागलेल्या वैभव सूर्यवंशीने अवघ्या ३७ चेंडूंत ५ चौकार आणि १ षटकारासह ४४ धावांची स्फोटक खेळी साकारली. (Vaibhav Siraj Video)
वैभवने सिराजला दाखवले तारा – (Vaibhav Siraj Video)
श्रीलंका दौऱ्यावरून परतल्यानंतर साऊथ झोनच्या संघात सामील झालेला भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजविरुद्ध वैभव कसा खेळतो, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. मात्र, या १५ वर्षीय पठ्ठ्याने सिराजचा जराही दबाव न घेता त्याच्या १२ चेंडूंत तब्बल २२ धावा चोपल्या. वैभवने आपल्या डावातील एकमेव षटकार आणि तीन चौकार थेट सिराजच्या गोलंदाजीवरच वसूल केले. सिराजच्या एकाच षटकात लागोपाठ तीन बाऊंड्रीज ठोकत त्याने आंतरराष्ट्रीय गोलंदाजाला दिवसा तारे दाखवले.
शतकी सलामीने ईस्ट झोन मजबूत; अभिमन्यू ईश्वरनची भक्कम साथ – (Vaibhav Siraj Video)
4️⃣,6️⃣,4️⃣
Vaibhav Sooryavanshi on the charge with some delightful shots 🔥
The 50-run stand also comes up between Vaibhav and Abhimanyu Easwaran 🙌
Scorecard ▶️ https://t.co/KQf5Km69nk#DuleepTrophy | #SZvEZ pic.twitter.com/0XLR4LI50R
— BCCI Domestic (@BCCIdomestic) September 6, 2026
वैभवच्या या आक्रमक पवित्र्यामुळे साऊथ झोनच्या गोलंदाजांची रणनीती पूर्णपणे विस्कळीत झाली. दुसऱ्या बाजूने अनुभवी अभिमन्यू ईश्वरनने संयमी फलंदाजी करत त्याला उत्कृष्ट साथ दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी उभारून फायनल सामन्यात ईस्ट झोनला स्वप्नवत सुरुवात करून दिली. वैभवचे अर्धशतक अवघ्या ६ धावांनी हुकले असले, तरी त्याच्या निर्भय खेळीने उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
दुलीप ट्रॉफीनंतर थेट टीम इंडियात; अफगाणिस्तानविरुद्ध दिल्लीत उतरणार – (Vaibhav Siraj Video)
दुलीप ट्रॉफीची फायनल संपताच वैभव सूर्यवंशीला दिल्लीत भारतीय संघासोबत जोडले जावे लागणार आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांची आंतरराष्ट्रीय टी-२० मालिका १३ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. भारतीय भूमीवर वैभवचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना ठरणार असल्याने या मालिकेत त्याच्या कामगिरीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.





