Vaibhav Jersey Number : वैभव सूर्यवंशीने १८-१२ नंतर जर्सी नंबर ३ का निवडला? आईच्या ‘त्या’ एका सल्ल्याने बदललं नशीब
Vaibhav Jersey Number : दाच्या आयपीएलमध्ये रोहित शर्मा, एमएस धोनी आणि विराट कोहली यांच्या लोकप्रिय जर्सीपेक्षाही जास्त वैभवच्या 'नंबर ३' जर्सीची विक्री झाली असून, स्टेडियममध्ये हजारो चाहते हीच जर्सी घालून पोहोचत आहेत.

Vaibhav Sooryavanshi Jersey Number 3 : आयपीएल २०२६ मध्ये (IPL 2026) आपल्या स्फोटक फलंदाजीने जगभरात तबाही माजवणारा राजस्थान रॉयल्सचा (RR) १५ वर्षांचा वंडर बॉय वैभव सूर्यवंशी (Vaibhav Sooryavanshi) सध्या क्रिकेट विश्वाच्या केंद्रस्थानी आहे. चालू हंगामात तब्बल ६५ षटकार ठोकून जागतिक विक्रम रचणारा वैभव जितका त्याच्या खूंखार फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे, तितकाच तो सध्या त्याच्या ‘जर्सी नंबर ३’ (Jersey Number 3) मुळेही चर्चेत आला आहे. काही रिपोर्ट्सनुसार, यंदाच्या आयपीएलमध्ये रोहित शर्मा, एमएस धोनी आणि विराट कोहली यांच्या लोकप्रिय जर्सीपेक्षाही जास्त वैभवच्या ‘नंबर ३’ जर्सीची विक्री झाली असून, स्टेडियममध्ये हजारो चाहते हीच जर्सी घालून पोहोचत आहेत.
जर्सी नंबर १२ ते नंबर ३; कसा बदलला नंबर?
- वैभव सूर्यवंशीच्या या छोट्याशा पण झंझावाती कारकिर्दीत त्याचा तीन वेगवेगळ्या जर्सी नंबरशी संबंध आला आहे:
- आयपीएल २०२५: पदार्पण करताना तो १२ नंबरची जर्सी घालून मैदानात उतरला होता.
- अंडर-१९ भारतीय संघ: भारतासाठी खेळताना त्याने १८ नंबरची जर्सी परिधान केली होती.
- रायझिंग स्टार्स आशिया कप: या स्पर्धेत त्याला ३ नंबरची जर्सी मिळाली आणि तेव्हापासून हा नंबर त्याची मुख्य ओळख बनला आहे.
काय आहे जर्सी नंबर ३ मागचे ‘आईचे गणित’?
He said he wanted to contribute as much as he could and boy did he contribute. Tore the SRH bowling apart and his knock was the difference between the two sides🙌
Vaibhav Sooryavanshi has got class, temperament and all the ability in the world🔥#SRHvsRR | #IPL2026 pic.twitter.com/wZhRmkgyOk
— Sports Theory (@learning87083) May 28, 2026
क्रिकेट जगतात अनेक खेळाडू त्यांच्या जन्मतारखेनुसार किंवा अंधश्रद्धेपोटी लकी नंबर निवडतात. मात्र, वैभवच्या नंबर ३ मागची कहाणी त्याच्या आईच्या एका मजेशीर सल्ल्यावर आधारित आहे. स्वतः वैभवने या गुपिताचा खुलासा करताना सांगितले, “माझ्या आईची इच्छा होती की मी ३ नंबरची जर्सी घालावी. तिने मला यामागे एक साधे गणित सांगितले. आई म्हणाली की, गणिताच्या हिशोबाने पाहिलं तर १ आणि २ मिळून सुद्धा ३ च होतात (1+2 = 3). त्यामुळे जर्सीवर उगीच ‘१२’ नंबर लिहिण्यापेक्षा थेट ‘३’ नंबरच का घेत नाहीस?” आईच्या या प्रेमळ आणि कल्पक सल्ल्याचा मान ठेवत वैभवने ३ नंबरची जर्सी निवडली.
आईच्या आशीर्वादाने मैदानावर ‘तांडव’!
आईने सुचवलेला हा जर्सी नंबर वैभवसाठी खरोखरच प्रचंड लकी ठरला आहे. आयपीएल २०२६ मध्ये तो ६८० धावांसह ‘ऑरेंज कॅप’च्या शर्यतीत सर्वात आघाडीवर आहे. १५ सामन्यांत ४५.३३ च्या सरासरीने आणि २४२.८६ च्या भयंकर स्ट्राईक रेटने त्याने धावा कुटल्या आहेत. यात १ शतक आणि ४ अर्धशतकांचा समावेश असून, एकाच हंगामात सर्वाधिक ६५ षटकार मारणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.





