Vaibhav Sooryavanshi Price : ‘ऋषभ २७ वर थांबला, पण हा पोरगा थेट ‘इतक्या’ कोटी पार जाणार!’; वैभव सूर्यवंशीबद्दल माजी खेळाडूची भविष्यवाणी
Vaibhav Sooryavanshi Price : आयपीएल २०२६ मध्ये वैभव सूर्यवंशीने खळबळ उडवून दिली आहे. पण सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, जर सूर्यवंशी आयपीएल लिलावात उतरला, तर त्याला किती किंमत मिळेल.

Aakash Chopra on Vaibhav Sooryavanshi Auction Price : आयपीएल २०२६ मध्ये आपल्या बॅटिंगने जगभरात धुमाकूळ घालणारा राजस्थान रॉयल्सचा १५ वर्षांचा वंडर बॉय वैभव सूर्यवंशी सध्या प्रत्येक क्रिकेट चाहत्याच्या गळ्यातील ताईत बनला आहे. चालू हंगामात १५ सामन्यांत ६८० धावा कुटून ‘ऑरेंज कॅप’ आपल्याकडे राखणाऱ्या वैभवने नुकत्याच झालेल्या एलिमिनेटर सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध अवघ्या २९ चेंडूंत ९७ धावांची ऐतिहासिक खेळी केली. या तुफानी कामगिरीनंतर, जर वैभव सूर्यवंशी कधी आयपीएलच्या ऑक्शन टेबलवर आला, तर त्याला किती कोटी मिळतील? यावर चर्चा रंगू लागल्या आहेत. याच दरम्यान भारताचे माजी फलंदाज आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा यांनी एक अत्यंत मोठे आणि खळबळजनक विधान केले आहे.
“तो ऑक्शनमध्ये आला, तर आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरेल!”
वैभव सूर्यवंशीचे तोंडभरून कौतुक करताना आकाश चोप्रा आपल्या यूट्यूब चॅनेलवर म्हणाले, “वैभव सूर्यवंशी जर आयपीएल ऑक्शनच्या टेबलवर आला, तर भाई तो किती कोटींना विकला जाईल? तसे पाहायला गेले तर राजस्थान रॉयल्स त्याला आपल्या संघात कायम ठेवण्यासाठी आपली सर्व ताकद पणाला लावेल आणि तो ऑक्शनमध्ये येण्याची शक्यता फार कमी आहे. पण, जर हा आपला मुलगा चुकूनही ऑक्शनमध्ये आला ना, तर तो आयपीएलच्या संपूर्ण इतिहासातील आजवरचा सर्वात महागडा खेळाडू ठरेल, यात मला तिळमात्र शंका नाही.”
३० कोटी की ३३ कोटी? आकाश चोप्रांनी सांगितले गणिते!
Hindi Commentary standards are literally worst man 🤷♂️
Harbhajan Singh raised a question: If by chance Vaibhav Suryavanshi comes to the auction, how far would you go for him? 🤔
Aakash Chopra replied: “At least 30 crores. After that, we also have to keep our purse value in… pic.twitter.com/TgLx9XeOCO
— ` (@OxygenKohlii18) May 27, 2026
खेळाडूंच्या वाढत्या किमतींवर बोलताना आकाश चोप्रा पुढे म्हणाले, “ऋषभ पंत ऑक्शनमध्ये २७ कोटी रुपयांना विकला गेला होता, पण वैभव थेट ३० कोटींच्या पार जाईल! अनेक फ्रँचायझी त्याच्यासाठी ३० कोटी रुपये बाजूला ठेवूनच ऑक्शनला बसतील. एवढेच नाही तर, एखादा संघ अधिक धाडस दाखवून त्याच्यासाठी थेट ३३ कोटी रुपयांपर्यंतची बोली लावू शकतो आणि तो सर्व जुने रेकॉर्ड्स उद्ध्वस्त करेल. जर भविष्यात संघांचे एकूण बजेट २०० कोटी रुपये झाले, तर त्याला ५० कोटी रुपये मिळाले तरी आश्चर्य वाटायला नको.”
साकिब हुसेन आणि प्रियांश आर्य यांच्यावरही मोठी भविष्यवाणी!
वैभव व्यतिरिक्त आकाश चोप्रा यांनी इतर अनकॅप्ड खेळाडूंच्या किमतीवरही भाष्य केले. हैदराबादचा वेगवान गोलंदाज साकिब हुसेनबाबत बोलताना ते म्हणाले, “साकिबने या हंगामात अप्रतिम गोलंदाजी केली आहे. आगामी मोठ्या ऑक्शनमध्ये तो सहज ८ ते ९ कोटी रुपयांच्या घरात जाईल, कारण तो खूप तगडा खेळाडू आहे.” तर दुसरीकडे फलंदाज प्रियांश आर्यबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, “प्रियांशसाठी हा हंगाम तितकासा चांगला राहिला नसला, तरी त्याची फलंदाजी पाहता मोठ्या ऑक्शनमध्ये तो किमान ८ ते १० कोटी रुपयांचा खेळाडू असायला हवा.”





