Vaibhav Sooryavanshi Angry : भारत-श्रीलंका सेमाफायनलमध्ये नेमकं असं काय घडलं? ज्यामुळे वैभव सूर्यवंशी थेट अंपायरवर भडकला, पाहा VIDEO
Vaibhav Sooryavanshi Angry on Umpire : आशिया चषक रायझिंग स्टार्स २०२६ च्या सेमीफायनलमध्ये श्रीलंकेने भारताला ८ विकेट्सनी धूळ चारत फायनलमध्ये एन्ट्री मारली. मात्र, या सामन्यात वैभव सूर्यवंशी अंपायरवर प्रचंड संतापलेला दिसला, याचं कारण काय होतं? जाणून घेऊया.

Vaibhav Sooryavanshi Angry on umpire video viral : कतारमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक रायझिंग स्टार्स २०२६ च्या सेमीफायनलमध्ये भारत-ए आणि श्रीलंका-ए आमनेसामने आले होते. प्रथम फलंदाजी करताना भारताने ५० षटकांत ३१७ धावांचा डोंगर उभारला. मात्र, श्रीलंकेच्या दोन फलंदाजांनी झळकावलेल्या शतकांच्या जोरावर त्यांनी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. या सामन्यादरम्यान युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी पंचांच्या एका निर्णयावर संतापलेसा दिसला, त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
२४ व्या षटकात पंचांच्या निर्णयाने वाढवला तणाव –
श्रीलंकेचा संघ ३१८ धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करत असताना हा प्रकार घडला. भारताकडून २४ वे षटक टाकण्यासाठी फिरकी गोलंदाज शाहबाज अहमद गोलंदाजीला आला होता. त्याच्या षटकातील पाचवा चेंडू श्रीलंकेचा फलंदाज लसिथ क्रूसपुलेच्या पॅडवर जाऊन आदळला. त्यावेळी शाहबाज अहमदसह मैदानावरील सर्वच भारतीय खेळाडूंनी पायचितसाठी जोरदार अपील केले. मात्र, पंचांनी ही मागणी फेटाळून लावत फलंदाजाला नाबाद घोषित केले.
वैभवची पंचांशी चर्चा, शाहबाजनेही व्यक्त केला संताप –
Worst umpiring 🤯
Wait for end the aggression of Vaibhav Suryavanshi 😭
Tilak Verma stop Vaibhav Suryavanshi. https://t.co/DLjm7Z0GYI
— VIKAS (@Vikas662005) November 27, 2026
पंचांचा हा निर्णय वैभव सूर्यवंशीला अजिबात रुचला नाही, कारण चेंडू थेट यष्टीवर आदळत असल्याचे दिसत होते. त्यामुळे वैभवने तात्काळ पंचांजवळ जाऊन त्यांच्याशी चर्चा केली, तर गोलंदाज शाहबाज अहमदनेही संताप व्यक्त केला. शाहबाजने मधल्या यष्टीच्या रेषेवर टाकलेला चेंडू क्रूसपुलेला फ्लिक करता आला नव्हता. मात्र, पंचांच्या मते हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जात असल्याने त्यांनी बाद दिले नाही.
भारताच्या स्वप्नावर श्रीलंकेच्या दोन फलंदाजांनी फिरवलं पाणी –
Shahbaz and Tilak Verma gone mad 😡
Vaibhav Sooryavanshi fighting with umpire
Umpiring is so poor in this match https://t.co/R6wyJ1T5tM— BackToLobby (@_backtolobby) November 26, 2026
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना भारताकडून अभिषेक शर्माने सर्वाधिक ७८ धावांची शानदार खेळी केली. त्याला शाहबाज अहमदने ५४ धावांचे अर्धशतक झळकावत, तर कर्णधार तिलक वर्माने ५३ धावांचे योगदान देत साथ दिली आणि संघाला ३१७ धावांपर्यंत नेले. प्रत्युत्तरात ३१८ धावांचा पाठलाग करताना लसिथ क्रूसपुलेने ११६ आणि सिनेथ जयवर्धनेने १०५ धावांची शतकी खेळी करत श्रीलंकेला आठ गडी राखून विजय मिळवून दिला.





