मुहूर्त ठरला ! छत्रपती शिवरायांची वाघनखं विशेष विमानाने उद्या राज्यात येणार ; 19 जुलैला होणार भव्य सोहळा

vaghnakh । बहुप्रतिक्षित छत्रपती शिवरायांची वाघनखं अखेर विशेष विमानाने उद्या महाराष्ट्रात येणार आहेत. त्यानंतर ती साताऱ्यात आणण्यात येणार आहेत. 19 जुलैला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भव्य दिव्य सोहळा होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
हिंदवी स्वराज्याच्या सातारा या चौथ्या राजधानीतील छत्रपती शिवाजी महाराज प्राचीन वस्तू संग्रहालयामध्ये ही वाघनखं लोकांना पाहण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. यासाठी विशेष दालनही उभारण्यात आले असल्याचे सांगण्यात येतंय.
विशेष विमानाने वाघनखं उद्या महाराष्ट्रात vaghnakh ।
लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममधून ही वाघनखे तीन वर्षांसाठी भारतात आणली जाणार असून साताऱ्यातील संग्रहालयात पुढील दहा महिने ही वाघनखे इतिहासप्रेमींसह सर्व नागरिकांना पाहता येणार आहे. ऐतिहासिक महत्त्व असलेली वाघनखे भारतात कधी येणार ही प्रतीक्षा आता संपली असून गुरुवारी संध्याकाळी ही वाघनखं महाराष्ट्रात विशेष विमानाने आणली जाणार आहेत.
शुक्रवारी होणार भव्य दिव्य सोहळा vaghnakh ।
पुरातत्त्व विभागाच्या साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात ही वाघनखे ठेवण्यात येणार असून शुक्रवारी 19 जुलै रोजी भव्य दिव्य सोहळा होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह राज्यातील इतर लोकप्रतिनिधींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
वाघनखं भारतात आणण्यासाठी किती झाला खर्च?
वाघ नख भारतात आणण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च करण्यात आल्याचा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. यावर आपल्या अधिवेशनाचा एका दिवसाचा खर्च जेवढा आहे त्याच्या कितीतरी पट कमी खर्च झाला असल्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले. वाघनखं आणण्यासाठी जाण्याचा आणि येण्याचा 14 लाख 8 हजार रुपये खर्च झाला असल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले.
हेही वाचा
पहिली भूमिगत मेट्रो लवकरच मुंबईकरांच्या सेवेत होणार दाखल; उद्घाटनाची तारीख ठरली





