पहिली भूमिगत मेट्रो लवकरच मुंबईकरांच्या सेवेत होणार दाखल; उद्घाटनाची तारीख ठरली

Mumbai Metro | मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. परंतु आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुंबईच्या भूमिगत मेट्रोच्या पहिल्या टप्प्याला लवकरच सुरूवात होणार आहे. बुधवार २४ जुलै रोजी भूमिगत मेट्रोच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.
विनोद तावडे यांनी मुंबई मेट्रो-३ ची पहिली झलक दाखवणारा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईकरांचं जीवन आणखी सुखदायी बनवण्याची गॅरंटी दिली होती. ती आता पूर्ण होण्याची वेळ आली आहे. मुंबईला आपली पहिलीवहिली भूमिगत मेट्रो २४ जुलैपासून मिळणार आहे. जी शहराच्या वेगाला नवी भरारी देणार आहे”, असे ट्विट विनोद तावडे यांनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मेट्रोचे उद्घाटन होणार आहे. त्यामुळे आता येत्या २४ जुलैपासून मुंबई मेट्रो-३ मुंबईकरांच्या सेवेत दाखल आहे. Mumbai Metro |
प्रधानमंत्री @NarendraModi जी ने मुंबई वासियों के जीवन को सुगम बनाने की गारंटी दी थी, जो पूरी होने जा रही है।
मुंबई की पहली भूमिगत मेट्रो (Aqua Line) 24 जुलाई से शुरू हो रही है , जो शहर की रफ्तार को नई उड़ान देगी। pic.twitter.com/0YgepYbiHw
— Vinod Tawde (@TawdeVinod) July 17, 2024
मुंबई मेट्रो-३ प्रकल्पादरम्यान आरे कारशेडचा मुद्दा गाजला होता. तसंच पूर्णपणे भुयारी मार्ग असल्याने कामात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अखेर सीप्झ ते बीकेसी असा पहिला टप्पा २४ जुलै पासून मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे.
मुंबईतील भूमिगत मेट्रो प्रकल्पांतर्गत एकूण 27 स्थानकं असणार आहेत. 56 किलोमीटरपेक्षा जास्त लांब हा मार्ग आहे. ताशी 90 किमी वेगाने धावणाऱ्या या भूमिगत मेट्रो सेवा सकाळी 6.30 वाजता सुरू होईल आणि रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहील. Mumbai Metro |
हेही वाचा:
यूपीत भाजप मुस्लिम उमेदवार देऊ शकतो ? पोटनिवडणुकीवरून योगी आणि मंत्र्यांच्या बैठकीत चर्चा





