Vadgaon Sheri Assembly Election 2024 | विश्रांतवाडी-कळस परिसराचा कायापालट करणार – आमदार सुनील टिंगरे

पुणे(प्रतिनिधी) : विश्रांतवाडी, कळस भागात मोठ्याप्रमाणात विकास कामे चालू आहेत. पुढील कार्यकाळात या भागात विकासकामे करून या भागाचा कायापालट करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे वडगावशेरी मतदार संघाचे उमेदवार सुनील टिंगरे यांनी सांगितले.
टिंगरे यांच्या प्रचारार्थ शनिवारी कळस येथे पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी टिंगरे यांनी मतदारांशी संवाद साधताना ते बोलत होते. या वेळी ठिकठिकाणी टिंगरे यांचे उस्फुर्त स्वागत करण्यात आले. माजी आमदार जगदीश मुळीक यांच्यासह भाजप, महायुतीचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार टिंगरे मतदारांशी संवाद साधला. दिली.
टिंगरे म्हणाले की, विश्रांतवाडी चौकातील कोंडी फोडण्यासाठी नागरिकांच्या मागणीची दखल घेत या चौकात उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटरसाठी साठ कोटींहून अधिक निधी आणला आहे . त्यामुळे लोहगाव, धानोरी, टिंगरेनगर, विश्रांतवाडी, कळस, व आळंदीकडे जाणाऱ्या वाहनचालकांची मोठी सोय होणार आहे. उड्डाणपूल करताना भविष्यात आळंदी व विमानतळाकडे जाणाऱ्या मेट्रोचे नियोजनही केले आहे. त्यामुळे लवकरच या चौकातील कोंडीतून नागरिकांची सुटका होईल.
या शिवाय, आळंदी – विश्रांतवाडी रस्ता हा आळंदी, देहू व वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतीस्थळाकडे जाणारा व आळंदी – पंढरपूर वारीचा महत्त्वाचा महामार्ग आहे. वारकरी संप्रदायाच्या भावना लक्षात घेऊन कळस येथील चौकात संत श्री ज्ञानेश्वर महाराज, संत श्री तुकाराम महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमा उभारण्यात आल्या असल्याचेही टिंगरे यांनी वेळी मतदारांशी बोलताना स्पष्ट केले.





