पुणे – करोना प्रतिबंधक लस उपलब्ध नसल्याने सलग लसीकरण बंद ठेवण्यात आल्याचे महापालिकेतर्फे कळवण्यात आले आहे.
शहरात सध्या करोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम चांगलीच विस्कळीत झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून लसच उपलब्ध नसल्याने लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आली आहेत. गुरूवारी लस उपलब्ध झाल्यानंतर केंद्र सुरू करण्यात येतील, अशी माहिती महापालिकेतील लसीकरण मोहीम प्रमुख डॉ. सूर्यकांत देवकर यांनी सांगितले.