मावळ परिसरातील 113 जनावरांचे लसीकरण

पवनानगर -मावळातील लोहगड, घेरेवाडी येथील जनावरांना लम्पी या आजाराची लागण होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले आहे. गावातील 55 गाई व 58 बैल एकूण 113 जनावरांचे लसीकरण करण्यात आले.
महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुरांवरील लम्पी सदृश्य आजारामुळे बळीराजा भयभीत झाला आहे. राज्यात लम्पी या आजाराने जनावरांचा मृत्यू होत आहे. यामुळे राज्य सरकार आणि आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. तसेच आपल्या गावातील पशू धनाला लम्पी या आजाराची लागण होऊ नये म्हणून लोहगड घेरेवाडी येथील जनावरांना लम्पी प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले आहे. गावातील 55 गाई व 58 बैल एकूण 113 जनावरांचे लसीकरण करण्यात आले.
या वेळी लोहगड विकास सोसायटीचे अध्यक्ष गणेश धनिवले, सरपंच नागेश मरगळे, पोलीस पाटील सचिन भोरडे, उपसरपंच गणपत ढाकोळ, पशुवैद्यकीय अधिकरी डॉ. अविनाश वाघमारे, डॉ. सीमा वाघमारे, तुकाराम साबळे, बाळू ढाकोळ, अकबर शेख, बाळू कोकरे आदी उपस्थित होते.





