गोखलेनगर भागात 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी लसीकरण केंद्र सुरू
Updated On:

पुणे – गोखलेनगर भागात 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठीचे लसीणकरण केंद्र सुरू झाले आहे. कार्यक्षम नगरसेवक आदित्य माळवे यांनी याबबत महापौर मुरलीधर मोहोळ आणि आयुक्त विक्रमकुमार यांच्याकडे लसीकरण सुरू करण्याची मागणी केली होती.
या मागणीस यश आले आहे. महापौर मोहोळ आणि आयुक्त विक्रमकुमार यांनी प्रतिसाद देत असे लसीकरण केंद्र सुरू करण्यास परवानगी दिली. शनिवार (दि. 8) पासून येथील बाबा आमटे हॉल येथे हे लसीकरण केंद्र सुरू झाले आहे. मुलांच्या लसीकरणासाठी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन माळवे यांनी केले आहे.





