रंगामुळे ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला मिळालेला नकार; स्वतः सांगितला लाजिरवाणा अनुभव

Vaani Kapoor – ‘शुद्ध देसी रोमांस’ या चित्रपटातून दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतसोबत अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या अभिनेत्री ‘वाणी कपूर’चे नाव बॉलिवूड मधील आघाडीच्या नायिकांमध्ये घेतले जाते. अत्यंत बेधडक, बिनधास्त आणि बोल्ड अशी वाणी कपूरची स्वतःची वेगळी ओळख आहे.
तिचे व्यक्तीमत्त्व, सौंदर्य आणि तिच्या मादक अदांनी तिने अनेक चाहत्यांना घायाळ केले आहे. ती नेहमी सोशल मीडियावर स्वतःचे बोल्ड आणि मादक फोटो-व्हिडिओ शेअर करत असते. असे फोटो शेअर करुन ती आयुष्यातील प्रत्येक घटना आपल्या चाहत्यांशी शेअर करत असते.
दरम्यान, अश्यातच वाणी कपूरने रंगामुळे तिला नकार मिळाला असल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या मुलाखतीमध्ये ती म्हणाली, “एका चित्रपटनिर्मात्याने एका भूमिकेसाठी मला मी रंगाने तितकी गोरी नसल्याने नाकारलं होतं.” पुढे अभिनेत्रीने तिला तिच्या शरीरयष्टीमुळेसुद्धा अनेकदा बोललं गेलं असल्याचं सांगितलं आहे.
View this post on Instagram
याबाबत अभिनेत्री म्हणाली, “मला नेहमी मी खूप बारीक आहे त्यामुळे ऐकावं लागतं. बरेचजण मला खात जा, वजन वाढव असं म्हणत असतात. पण, मला मी जशी आहे तशीच आवडते. मला माझ्यामध्ये कोणताही बदल करावासा वाटत नाही.
मी फिट आणि निरोगी आहे. मला अशा गोष्टींचा फार फरक पडत नाही. काही वेळेला आपल्याला माहीत नसतं, पण काही लोक आपल्याला चांगल्या हेतूनेही सांगत असतात. तरी मला मी जशी आहे तशीच आवडते.” असं देखील वाणी यावेळी म्हणाली.
दरम्यान, वाणी कपूरच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर सध्या ती तिच्या ‘मंडला मर्डर्स’ या वेब सीरिजचं प्रमोशन करत आहे. ही एक क्राईम थ्रीलर सीरज आहे. यामध्ये ती एका हुशार तपास अधिकाऱ्याच्या भूमिकेतून झळकणार आहे.





