मुंबई – शमशेरा चित्रपटाच्या अपयशानंतर वाणी कपूर परदेश दौऱ्यावर आहे. वाणी कपूर मेलबर्नच्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली होती. या कार्यक्रमातील काही फोटो वाणीने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यावर चाहत्यांनी नाराजीचा सूर आवळला असल्याचे पाहायला मिळते. वाणी अजूनही आपल्या ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या प्रतीक्षेत आहे. फोटोंद्वारे वाणी कपूरने अतिशय ग्लॅमरस लुक चाहत्यांसोबत शेअर केला आहे. कार्यक्रमासाठी परिधान केलेल्या उच्च स्लिट व्हाइट स्कर्ट आणि क्रॉप टॉपमध्ये वाणी कपूर खूपच हॉट आणि बोल्ड दिसत होती. अनेकजण वाणीच्या स्टाईलचे दिवाने आहेत. तिची कपड्याची स्टाईल असो वा केसांची फॅन्सला वाणीच सर्वकाही आवडत. वाणीने केलेल्या सॉफ्ट मेकअपमुळे तिचा हा लूक आणखीनच आकर्षक वाटत होता. वाणी कपूरचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करत नाहीत, पण ती नेहमीच तिच्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत राहते.वाणीचा चित्रपट शमशेरा बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरला, परंतु तिची रोमँटिक केमिस्ट्री आणि चित्रपटातील रणबीर कपूरसोबतचा तिचा झगमगाट अवतार पाहून चित्रपटाला प्रेक्षकांचा जेमतेम प्रतिसाद मिळाला होता.