#Uttarakhand Election 2022:मतपेट्या फोडण्याच्या व्हिडिओवरून पोलिसांकडे तक्रार

पिथोरगड (उत्तराखंड) – मतपेट्या फोडण्याच्या व्हिडिओच्या आधारे निवडणूक आयोगाने आज पोलिसांकडे तक्रार दाखल केली. कॉंग्रेस नेते रावत यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. दिदीहाट पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून या संदर्भात तपास सुरू आहे, असेही पोलिसांनी म्हटले आहे.
या संदर्भात कॉंग्रेसचे उमेदवार प्रदीपपाल यांच्या वतीने निवडणूक आयोगाकडे आणि पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल झाली आहे. उत्तराखंडच्या विधानसभेच्या निवडणुकीदम्यान झालेल्या गैरव्यवहारांबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली असल्याचे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गणेश गोडियाल यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
एका मतदाराने मतदानादरम्यान तोतयेगिरी झाल्याचा दावा केला आहे. त्याचे मत नोंदवण्यासाठी अधिकारी त्याच्या घरी जाणार होते, मात्र ते अधिकारी गेलेच नाहीत, असेही गोडियाल यांनी सांगितले.





