UP : 16 देशांतील रोड शोमुळे उत्तर प्रदेशमध्ये 7 लाख 12 हजार कोटींची गुंतवणुक – योगी आदित्यनाथ

लखनौ : जीआयएस-2023 या गुंतवणूक शिखर परिषदेपूर्वी जगभरातील गुंतवणूकदारांना उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रित करण्याची आमची कृती योजना यशस्वी झाली आहे. 16 देशांतील रोड शोमुळे 7 लाख 12 हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.
परदेशात रोड शोच्या यशानंतर आता देशातील प्रमुख महानगरांमध्ये उद्योगांना आमंत्रण देण्यासाठी रोड शोचे आयोजन केले जात आहे. व्यापक गुंतवणुकीमुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील, ज्याचा थेट फायदा आपल्या तरुणांना होईल, असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/alternative-to-double-decker-tunnel-for-mumbai-is-the-need-of-the-hour-chief-minister-eknath-shinde/
आदित्यनाथ यांनी चित्रकूटधाम मंडळाचे खासदार आणि आमदारांसमवेत राज्याच्या हिताच्या दृष्टीने सुरू असलेल्या विकास प्रकल्पांच्या तपासणीच्या मालिकेचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी योगी यांनी 10-12 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या उत्तर प्रदेश ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटबाबत लोकप्रतिनिधींशी चर्चा केली.
“राज्य सरकारच्या नवीन औद्योगिक धोरणांचा खासदार-आमदारांनी व्यापक प्रचार करावा. स्थानिक विद्यापीठे, महाविद्यालये, पॉलिटेक्निक आणि आयटीआयमध्ये तरुणांमध्ये चर्चा व्हायला हवी. लोकप्रतिनिधींनी परिसरात सुरू असलेल्या विकास प्रकल्पांची सतत पाहणी करावी. लोकप्रतिनिधींना गुणवत्ता आणि समयसूचकता सुनिश्चित करण्यासाठी योगदान द्यावे लागेल. तंत्रज्ञानाचा अधिक चांगला वापर करा. आज सोशल मीडिया हे संवादाचे उत्तम माध्यम म्हणून उदयास आले आहे. सर्व खासदार आणि आमदारांनी या व्यासपीठाचा वापर करावा.
– योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री उत्तर प्रदेश
मुख्यमंत्री योगी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर प्रदेशने 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे लक्ष्य ठेवले आहे. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी संपूर्ण उत्तर प्रदेश एकजुटीने प्रयत्न करत आहे. ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट हे या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.





