खरगे यांचे स्पष्टीकरण –
\n
\nवादाचे स्वरूप वाढल्यानंतर मल्लिकार्जुन खरगे यांनी आपल्या विधानावर स्पष्टीकरण दिले आहे. आपला उद्देश पंतप्रधानांना वैयक्तिकरित्या दहशतवादी म्हणण्याचा नव्हता, तर ते आपल्या राजकीय विरोधकांना ‘धमकावत’ असल्याचे आपल्याला सुचवायचे होते, असे त्यांनी म्हटले. “पंतप्रधान मोदी ईडी, आयकर विभाग आणि सीबीआय सारख्या संस्थांचा वापर करून विरोधकांना घाबरवत आहेत, या अर्थाने मी ते विधान केले होते,” असा बचाव त्यांनी केला आहे. मात्र, भाजपने त्यांचे हे स्पष्टीकरण फेटाळून लावत माफीची मागणी केली आहे.
अमित शहा यांचा घणाघात –
\n
\nदुसरीकडे, पश्चिम बंगालमधील एका रॅलीत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या प्रकरणावरून काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. “ज्यांनी देशाला दहशतवादातून मुक्त केले, अशा नरेंद्र मोदींना खरगे दहशतवादी म्हणत आहेत. राहुल गांधींच्या सहवासामुळे खरगे यांची भाषा बिघडली आहे,” अशी बोचरी टीका शहा यांनी केली. मोदींना जेवढ्या शिव्या ल्यादि जातील, तेवढ्याच जोमाने कमळ फुलेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. आता निवडणूक आयोग या प्रकरणावर काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.