Dombivli : हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात अपशब्दाचा वापर; मराठी अमराठी आपापसात भिडले, Video व्हायरल

मुंबईः मुंबईत मराठी अमराठी वाद होण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी एका फळविक्रेत्यासोबत मराठी बोलण्याच्या कारणावरून मोठा वाद निर्माण झाला होता. अशा अनेक मराठी अमराठी वादावरून घडल्या आहेत, अशीच एक घटना काल रात्री मुंबईपासून काही अंतरावर असलेल्या डोंबवली भागातील एका सोसायटीत घडली. हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला अमराठी नागरिकांनी विरोध दर्शवल्याने वाद झाल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तसेच अमराठी लोकांनी अपशब्दाचा आरोप केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डोंबवली भागातील नांदीवलीमधील एका सोसायटीमध्ये सत्यनारायण पूजा आणि हळदी कुंकू कार्यक्रमाला रहिवाशांनी विरोध केला. यानंतर मराठी आणि अमराठी आपापसात भिडले. पुढे हे प्रकरण इतके वाढले की पोलिसांनी यात हस्तक्षेप करावा लागला. तसेच अमराठी लोकांनी मराठी माणसांना अपशब्द वापरल्याचा आरोप मराठी कुटुंबातील महिलांनी केला आहे. काल २७ जानेवारीला घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियवर प्रचंड व्हायरल झाला आहे. या वादामुळे एकच गोंधळ उडाला होता. काही काळ तणावाचे वातावरण देखील निर्माण झाले होते. अखेर या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी तक्रार दाखल केली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.





