“भारत आणि चीनवर 100% टॅरिफ लावा”; युरोपियन युनियननंतर आता G7 वर ट्रम्पचा दबाव

US tariffs on India China। रशियावर आर्थिक दबाव वाढवण्यासाठी अमेरिकेने आपल्या मित्र राष्ट्रांवर नवीन दबाव आणण्याचा प्रयत्न केले आहेत. एका इंग्रजी वर्तमानपत्राच्या माहितीनुसार, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भारत आणि चीनकडून रशियन तेल खरेदीवर G7 देशांनी 50 ते 100 टक्क्यांपर्यंतचे जड शुल्क लादण्याची इच्छा आहे.” असे सांगण्यात येत आहे.
या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी G7 देशांचे अर्थमंत्री शुक्रवारी व्हिडिओ कॉलद्वारे चर्चा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ट्रम्प यांनी यापूर्वी युरोपियन युनियनला बीजिंग आणि नवी दिल्लीवर 100 टक्क्यांपर्यंतचे शुल्क लादण्याचे आवाहन केले आहे. अमेरिकेच्या ट्रेझरी प्रवक्त्याने याविषयी माहिती देताना, “चीन आणि भारताने खरेदी केलेले रशियन तेल पुतिनचे युद्धयंत्र चालवत आहे आणि युक्रेनियन लोकांच्या हत्येला लांबणीवर टाकत आहे. युद्ध संपताच हे शुल्क काढून टाकले जातील.” असे म्हटले आहे. अमेरिका त्याला त्यांच्या “शांतता आणि समृद्धी प्रशासन” मधील एक महत्त्वाचा दुवा म्हणत आहे, ज्या अंतर्गत रशियाला शांतता चर्चेसाठी टेबलावर आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
हे आवाहन EU ला करण्यात आले होते US tariffs on India China।
दरम्यान , या अगोदर ट्रम्प यांनी युरोपियन युनियनला भारत आणि चीनवर 100 टक्क्यांपर्यंतचे शुल्क लादण्याचे आवाहन केले होते. ट्रम्प यांनी याविषयी, असे केल्याने रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर आर्थिक दबाव वाढेल.” असे म्हटले होते. एका अमेरिकन अधिकाऱ्याने याला पुष्टी दिली आणि सांगितले की, जर त्यांचे युरोपीय भागीदार त्याला पाठिंबा देतील तरच अमेरिका हे पाऊल उचलेल. या पावलाचा उद्देश भारत आणि चीनला रशियन तेल खरेदी करण्यापासून रोखणे आहे, जेणेकरून युद्धासाठी रशियाला मिळणारा आर्थिक पाठिंबा कमी करता येईल.
युरोपीय संघाच्या चिंता US tariffs on India China।
मात्र युरोपीय संघ (EU) याच्याशी सहमत दिसत नाही. ब्रुसेल्सचा असा विश्वास आहे की भारत आणि चीनसारख्या मोठ्या व्यापारी भागीदारांवर जास्त शुल्क आर्थिक जोखीम आणि प्रत्युत्तर दोन्ही निर्माण करतात. त्याऐवजी EU 2027 पर्यंत रशियन ऊर्जेवरील अवलंबित्व संपवण्याच्या आणि नवीन कठोर निर्बंध लादण्याच्या बाजूने आहे. सध्या G7 चे अध्यक्षपद भूषवणाऱ्या कॅनडाने बैठकीची पुष्टी केली आणि म्हटले की ते रशियाच्या युद्ध क्षमतेवर आणखी दबाव वाढवण्यासाठी “पुढील पावले” उचलण्याचा विचार करेल.





