अखेर डोनाल्ड ट्रम्प बॅकफूटवर ! मेक्सिको-कॅनडावरील २५ टक्के कराच्या निर्णयाला स्थगित ; १ महिन्यासाठी निर्णय लांबणीवर

US Tariff On Canada-Mexico । अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्याच निर्णयावरून बॅकफूटवर गेले आहेत. त्यांनी मेक्सिको-कॅनडावर २५ टक्के कर लादण्याच्या निर्णयाला स्थगित दिली आहे. कॅनडातून येणाऱ्या आयातीवरील प्रस्तावित यूएस टॅरिफ 30 दिवसांसाठी स्थगित करण्यास सहमती दर्शवली आहे. अमेरिकेत फेंटॅनिल तस्करी रोखण्यासाठी दोन्ही देशांनी पावले उचलण्याचे मान्य केल्यानंतर मेक्सिकोमधून आयातीवर अशाच प्रकारची बंदी घालण्यात आली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिकोमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर २५ टक्के कर लादण्याची घोषणा केली. त्यासोबतच चीनमधून येणाऱ्या वस्तूंवर १० टक्के कर प्रस्तावित केला. कॅनडामधून आयात होणाऱ्या ऊर्जा संसाधनांवर १० टक्के कर लादण्याचीही त्यांनी योजना आखली होती . मात्र आता त्यांनी कॅनडा आणि मेक्सिकोवरील कर लादण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे.
ट्रुडो यांचा इशारा US Tariff On Canada-Mexico ।
अमेकरिकेकडून जर हे कर लागू झाले तर कॅनडा १५५ अब्ज डॉलर्सच्या अमेरिकन वस्तूंवर २५ टक्के कर लागू होऊ शकतो, असा इशारा ट्रुडो यांनी दिला होता. सोमवारी ट्रुडो यांनी ट्विट करून सांगितले की ट्रम्प यांच्याशी त्यांची चर्चा यशस्वी झाली आहे आणि ३० दिवसांसाठी कर लादण्याचा निर्णय थांबवण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला” अशी माहिती त्यांनी दिली होती.
फेंटानिल तस्करी रोखण्यासाठी पावले
फेंटानिल तस्करी रोखण्यासाठी उचललेली पावले हे या बंदीचे एक प्रमुख कारण आहे. ट्रुडो यांनी, कॅनडाची “फेंटानिल जार नियुक्ती” करण्याची आणि फेंटानिल तस्करी रोखण्यासाठी सीमा सुरक्षा मजबूत करण्याची $1.3 अब्ज योजना आहे. या योजनेअंतर्गत, नवीन हेलिकॉप्टर, तंत्रज्ञान आणि १०,००० फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांसह कॅनडा-अमेरिका सीमेची सुरक्षा मजबूत केली जाईल.” असे म्हटले आहे. तसेच ट्रुडो यांनी पुढे लिहिले,”आमच्या अमेरिकन भागीदारांशी समन्वय वाढवून फेंटानिलचा पुरवठा थांबवण्यासाठी आवश्यक पावले उचलली जातील.”
ट्रम्प यांनी मेक्सिकोबाबतही नरमाई दाखवली US Tariff On Canada-Mexico ।
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिकोवरील कर एका महिन्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. मेक्सिकन राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शेनबॉम यांनी सोमवारी जाहीर केले की, “अमेरिकन राष्ट्राध्यक्षांशी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला व्हाईट हाऊसनेही दुजोरा दिला आहे. “असे म्हटले आहे. मेक्सिकोवर लादलेल्या शुल्काच्या स्थगितीमुळे दोन्ही देशांमधील आर्थिक तणाव तात्पुरता कमी झाला आहे. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प आता चीनबद्दल काय निर्णय घेतील हे पाहणे मनोरंजक असेल, कारण ज्या देशांमध्ये टॅरिफ लादण्यात आला आहे त्यात चीन देखील समाविष्ट आहे.





