US Shootings। अमेरिकेतील मिनियापोलिस याठिकाणी अॅन्युन्सिएशन कॅथोलिक स्कूलमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात तीन जण ठार झाले आणि २० जण जखमी झाले असल्याचे संगणयत येत आहे. एका अधिकाऱ्याने या घटनेविषयी माहिती देताना, “मृतांमध्ये हल्लेखोराचाही समावेश होता” असे म्हटले आहे. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, गोळीबार सुरू झाला तेव्हा मुले सकाळच्या प्रार्थना सभेला उपस्थित होती. ही शाळा कॅथोलिक चर्चशी संबंधित आहे आणि मिनियापोलिसच्या आग्नेय निवासी भागात आहे. गोळीबार झालेल्या कॅथोलिक शाळेत प्री-स्कूल ते आठवीपर्यंतची मुले शिकतात. याठिकाणी सुमारे ३९५ मुले दाखल आहेत. मिनेसोटाचे गव्हर्नर टिम वॉल्झ यांनी ही घटना भयानक US Shootings। मिनेसोटाचे गव्हर्नर टिम वॉल्झ या घटनेविषयी बोलताना, “आमच्या मुलांसाठी आणि शिक्षकांसाठी हे खूप वेदनादायक आहे, ज्यांचा शाळेचा पहिला आठवडा या हिंसाचारामुळे खराब झाला. त्यांनी मुलांसाठी आणि शिक्षकांसाठी प्रार्थना केली. घटनेनंतर पोलिस, एफबीआय, फेडरल एजंट आणि रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी पोहोचल्या. शाळेशी संबंधित एका व्यक्तीच्या मते, मुलांना शाळेतून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले” असे म्हटले आहे. वेदना व्यक्त करणे कठीण – मिनियापोलिसचे महापौर या घटनेची माहिती देताना मिनियापोलिसचे महापौर जेकब फ्रे यांनी,”ही घटना कल्पनेपलीकडे आहे. या घटनेची भयावहता शब्दात वर्णन करता येणार नाही. त्यांना दुसऱ्याची मुले समजू नका. स्वतःची मुले समजा. अनेक मुले मरण पावली आहेत” असे म्हटले आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना या घटनेची माहिती देण्यात आली एका इंग्रजी वृत्तवाहिनीनुसार,”मिनियापोलिसमधील कॅथोलिक शाळेत झालेल्या गोळीबाराची माहिती राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना देण्यात आली आहे. त्यांनी सांगितले की,”व्हाईट हाऊस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवरील पोस्टमध्ये लिहिले आहे ” ‘एफबीआय तात्काळ घटनास्थळी पोहोचले आहे आणि कारवाई करत आहे, मी या घटनेत सहभागी असलेल्या सर्व लोकांसाठी प्रार्थना करत आहे.’ २४ तासांत शहरात अनेक गोळीबाराच्या घटना US Shootings। गेल्या २४ तासांत मिनियापोलिस शहरात ही गोळीबाराची चौथी मोठी हिंसक घटना आहे. यापूर्वी मंगळवारी (२६ ऑगस्ट २०२५) दुपारी हायस्कूलबाहेर झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला होता आणि सहा जण जखमी झाले होते. काही तासांनंतर इतर दोन घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाला होता.