India-Pakistan ceasefire: ‘भारत-पाकिस्तान पूर्ण शस्त्रसंधीसाठी सहमत’, अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचा दावा

वॉशिंग्टन : भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला असताना, अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी मोठा दावा केला आहे. भारत आणि पाकिस्तान पूर्णपणे शस्त्रसंधी (सीजफायर) साठी सहमत झाले असल्याचे ट्रंप यांनी म्हटले आहे. अमेरिकी परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनीही याची पुष्टी केली. गेल्या ४८ तासांपासून अमेरिकी उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हॅन्स आणि स्वतः रुबियो भारत आणि पाकिस्तानच्या नेत्यांशी संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले. या दोन्ही नेत्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याशीही चर्चा केली आहे.
US President Donald Trump announces, “India-Pakistan have agreed to full and immediate ceasefire”
Read @ANI Story | https://t.co/77ZpWvYNuN#DonaldTrump #India #Pakistan pic.twitter.com/XUZ8fT8hdD
— ANI Digital (@ani_digital) May 10, 2025
पाकिस्तानच्या मंत्र्यांनीही केले विधान –
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी एक्स वर लिहिले की, पाकिस्तान आणि भारत यांनी तात्काळ प्रभावीपणे युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे.
Pakistan and India have agreed to a ceasefire with immediate effect. Pakistan has always strived for peace and security in the region, without compromising on its sovereignty and territorial integrity!
— Ishaq Dar (@MIshaqDar50) May 10, 2025





