Donald Trump – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी (26 मार्च) रात्री इराणला एक नवीन मुदत दिल्याचा दावा केला. ते म्हणाले की, इराणच्या ऊर्जा केंद्रांवर आता 10 दिवसांपर्यंत कोणतेही हल्ले होणार नाहीत. याआधी त्यांनी सोमवारी (23 मार्च) यासंदर्भात 5 दिवसांची मुदत दिली होती. ती मुदत आज (27 मार्च) संपते आहे. त्यातच पुन्हा मुदतवाढ देण्यात आल्याने युद्ध थांबण्याचे संकेत मिळत आहेत. ट्रम्प यांनी पोस्ट करत म्हटले की, इराणच्या सरकारने विनंती केल्यानंतर आम्ही त्यांच्या ऊर्जा प्रकल्पांवरील हल्ले 10 दिवसांपर्यंत पुढे ढकलले आहेत. ही मुदत 6 एप्रिल 2026 ला रात्री 8 वाजेपर्यंत लागू राहील. इराणबरोबर चर्चा सुरू आहे, असा दावा त्यांनी केला. Donald Trump इराणमध्ये योग्य लोकांबरोबर आमची चर्चा सुरू आहे. त्यांनी आम्हाला आणखी एक गिफ्ट दिले आहे. इराणने सांगितले की, तुमच्याबरोबरच्या चर्चेबाबत आम्ही गंभीर आहोत, हे दाखवण्यासाठी आम्ही होर्मुझच्या सामुद्रधुनीतून 8 मोठ्या जहाजांना जाण्याची परवानगी देत आहोत. दरम्यान, पश्िचम आशियात जवळपास एक महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. यामुळे जगभरातील इंधन आणि एलपीसी सेवा खंडीत झाली असून त्याचे वाईट परिणाम दिसून येत आहे.