US Open 2025 Final : महिला एकेरी अंतिम फेरी निश्चित; सबालेंका-अनिसिमोव्हा यांच्यात रंगणार जेतेपदाचा सामना

US Open 2025 Women’s Final Updates : यूएस ओपन 2025 आता अंतिम टप्प्यावर पोहोचले आहे. ५ सप्टेंबर रोजी महिला एकेरीच्या दोन्ही अंतिम फेरीतील खेळाडूंची नावे निश्चित झाली असून, जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या बेलारूसच्या आर्यना सबालेंकाचा सामना अमेरिकेच्या जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानी असलेल्या अमांडा अनिसिमोव्हाशी होणार आहे.
सबालेंकाची उपांत्य फेरीत २-१ ने विजयी झेप –
दोन्ही खेळाडूंनी उपांत्य फेरीत अप्रतिम कामगिरी करत अंतिम फेरीत स्थान मिळवले. सबालेंकाने जे. पेगुला यांचा पराभव केला, तर अनिसिमोव्हाने नाओमी ओसाकाला हरवत अंतिम फेरी गाठली.आर्यना सबालेंका आणि जे. पेगुला यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना अत्यंत चुरशीचा झाला. पहिल्या सेटमध्ये सबालेंकाला ४-६ अशा फरकाने पराभव स्वीकारावा लागला.
𝐔𝐒 𝐎𝐩𝐞𝐧 𝐓𝐞𝐧𝐧𝐢𝐬🎾||
अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम फेरीत अमांडा अनिसिमोवानं नाओमी ओसाकाला हरवून गतविजेत्या आर्यना सबालेंकासोबत प्रवेश केला.#USOpen | #AmandaAnisimova | #ArynaSabalenka | #NaomiOsaka pic.twitter.com/T06ZhAbxcj
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) September 5, 2025
मात्र, दुसऱ्या सेटमध्ये सबालेंकाने शानदार पुनरागमन करत ६-३ अशा फरकाने विजय मिळवला आणि सामना १-१ अशा बरोबरीवर आणला. तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. यावेळी सबालेंकाने पेगुलाला कोणतीही संधी न देता ६-४ अशा फरकाने सेट जिंकला आणि २-१ ने सामना खिशात घालत अंतिम फेरीत प्रवेश केला.
हेही वाचा – Yograj Singh : ‘युवराजचा खरा मित्र फक्त सचिन! बाकी पाठीत खंजीर खुपसणारे…’, योगराज सिंगचा खळबळजनक दावा
अनिसिमोव्हाला ओसाकाकडून कडवी झुंज –
अमेरिकेच्या अमांडा अनिसिमोव्हाला नाओमी ओसाकाविरुद्ध उपांत्य फेरीत विजयासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागले. पहिल्या दोन सेटचे निकाल टायब्रेकरमधून निश्चित झाले, तर तिसऱ्या सेटमध्ये अनिसिमोव्हाने सरळ विजय मिळवत अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले. पहिल्या सेटमध्ये अनिसिमोव्हाला ७-६ (७-४) अशा फरकाने पराभव पत्करावा लागला. दुसऱ्या सेटमध्ये तिने ६-७ (३-७) अशा फरकाने विजय मिळवला. तिसऱ्या सेटमध्ये अनिसिमोव्हाने ३-६ अशा फरकाने सेट जिंकत सामना आपल्या नावावर केला.
हेही वाचा – Mitchell Starc : निवृत्तीनंतर मिचेल स्टार्कने का मागितली कर्णधार मार्शची माफी? नेमकं कारण काय? जाणून घ्या
अंतिम सामना ७ सप्टेंबरला –
आर्यना सबालेंका आणि अमांडा अनिसिमोव्हा यांच्यात ७ सप्टेंबर 2025 रोजी न्यूयॉर्कमधील आर्थर अॅश स्टेडियमवर यूएस ओपन 2025 चा महिला एकेरी अंतिम सामना रंगणार आहे. भारतीय चाहते हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकतील.





