US Open 2024 : जोकोविचची सोप्या विजयासह दुसऱ्या फेरीत धडक…

US Open 2024 : – सर्बियाचा आघाडीचा टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने मोल्दोव्हाच्या रॅडू अल्बोटला सरळ सेटमध्ये पराभूत करताना 25 व्या ग्रँड स्लॅम विजेतेपदासाठीच्या प्रवासाला सुरुवात केली. नुकत्याच झालेल्या 33 व्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळविल्यानंतर जोकोविच प्रथमच कोर्टावर अवतरला. त्याने रॅडू अल्बोटला 6-2,6-2,6-4 असे पराभूत केले.
आतापर्यंत जोकोविच महत्वाच्या स्पर्धाच्या पहिल्या फेरीत पराभूत झालेला नाही. त्याने खेळलेल्या हार्डकोर्ट वरील 89 लढतींपैकी केवळ 13 लढती गमावल्या आहेत. युएस ओपन स्पर्धेत जोकोविच आतापर्यंत तिसऱ्या फेरीपूर्वी एकदाही पराभूत झाला नाही. मोल्दोव्हाच्या रॅडू अल्बोटने आतापर्यंत एकदाही तिसऱ्या फेरीच्या पुढे मजल मारलेली नाही. जोकोविच 138 पेक्षा जास्त मानांकन असलेल्या विरोधी खेळाडूंकडून ग्रँड स्लॅम स्पर्धेत पराभूत झालेला नाही. तर अल्बोटने आतापर्यंत पहिल्या 10 मानांकित खेळाडूंपैकी एकाही खेळाडूला पराभूत केलेले नाही.
सोमवारी झालेल्या लढतीमध्ये जोकोविचने पहिल्यापासून एकतर्फी वर्चस्व राखले होते. पहिला सेट 6-2 असा, दुसरा सेट 6-2 असा तर तिसरा सेट 6-4 असा सहज जिंकला. त्याने रॅडू अल्बोटला पुनरागमन करण्याची एकही संधी दिली नाही.
US Open 2024 : भारताच्या सुमित नागलचं पुरुष एकेरीतलं आव्हान संपुष्टात….
स्पर्धेची चांगली सुरुवात करणे नेहमीच आव्हानात्मक असते. विशेषतः हार्डकोर्टवर तुम्ही पाच-सहा महिन्यापासून खेळलेले नसता, तेव्हा हे आव्हान जास्त कठीण असते. या स्पर्धेपूर्वी माझे कोणतेही अधिकृत सामने झाले नसल्याने, या स्पर्धेच्या सुरुवातीच्या फेर्यांमध्ये माझ्यासमोर थोडे अधिक अधिक आव्हान असणार आहे. त्यामुळे मी अजून चांगला खेळ करण्याचा प्रयन्त करणार असल्याचे, पहिल्या फेरीत विजयी झालेल्या नोव्हाक जोकोविचने लढतीनंतर बोलताना सांगितले.





