US Open 2024 : ट्युनिशियाच्या ओन्स जाबेरची स्पर्धेतून अचानक माघार, समोर आलं ‘हे’ कारण…

US Open 2024 :- युएस ओपन टेनिसची माजी उपविजेती आणि ट्युनिशियाची खेळाडू ओन्स जाबेर हिला खांद्याच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. सोमवारपासून सुरु होणाऱ्या स्पर्धेत जाबेर 17 वी मानांकित खेळाडू होती. मात्र तिने माघार घेतल्याने 33 व्या मानांकित खेळाडू असलेल्या एलिस मर्टेन्सला या स्पर्धेत स्थान मिळाले आहे.
मॉन्ट्रियलमध्ये झालेल्या लढतीत तिला नाओमी ओसाकाकडून पराभूत व्हावे लागले होते. तेव्हापासून ती दुखापतग्रस्त आहे. यासंदर्भात तिने सोशल मीडियावर पोस्ट करताना खांद्याची दुखापत वेळेत बरी न झाल्यामुळे माघार घेत असल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान, ट्युनिशियाच्या ओन्स जाबेर हिने 2022 व 2023 च्या हंगामात विम्बल्डनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
दरम्यान,या महिन्याच्या सुरुवातीला, उजव्या खांद्याच्या दुखापतीमुळे तिने सिटी ओपनमधून माघार घेतली होती आणि जूनमध्ये तिला उपांत्यपूर्व फेरीदरम्यान बर्लिन ओपनमधून निवृत्त व्हावे लागले होते. गुडघ्याच्या समस्येमुळे ती पॅरिस ऑलिम्पिकलाही मुकली होती.





