भारताने F-16 लढाऊ विमाने खरंच पाडली का? ; अमेरिका म्हणाले,”पाकिस्तानला विचारा…”

US on F-16 । ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्ष झाला होता. त्यावेळी भारताने पाकिस्तानच्या F-16 लढाऊ विमानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. याच संदर्भात एका वृत्तवाहिनीने सवाल केला. मात्र पाकिस्तानी F-16 लढाऊ विमानांच्या नुकसानीबद्दल विचारलेल्या प्रश्नांना अमेरिकेने थेट उत्तर देण्यास नकार दिला. यावर, अमेरिकन परराष्ट्र विभागाने, “आम्ही तुम्हाला पाकिस्तान सरकारशी त्यांच्या F-16 विमानांबद्दल चर्चा करण्यास सांगू.”असे म्हणत प्रश्नाच्या उत्तराची टाळाटाळ केली.
अमेरिका पाकिस्तानच्या F-16 ताफ्यावर लक्ष ठेवण्यासाठी एक तांत्रिक सहाय्य पथक (टीएसटी) तैनात ठेवते, जे विमानांच्या स्थितीवर चोवीस तास लक्ष ठेवते. ही प्रणाली पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यातील करारानुसार काम करते, जी F-16 च्या लढाऊ वापराच्या अटींवर आधारित आहे. US on F-16 ।
भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंग यांच्या मते, शाहबाज जेकबाबाद एअरबेसवरील F-16 हँगरचा अर्धा भाग नष्ट झाला होता आणि आम्हाला खात्री आहे की आत काही विमानांचे नुकसान झाले आहे. त्यांनी सांगितले की, भारतीय हल्ल्यांचे लक्ष्य सुक्कुरचे यूएव्ही हँगर, भोलारीचे एईडब्ल्यू अँड सी हँगर, जेकबाबादचे F-16 हँगर होते. भारतीय हवाई दलाचा दावा आहे की या कारवाईदरम्यान एकूण ६ पाकिस्तानी विमाने पाडण्यात आली, ज्यात ५ लढाऊ विमाने आणि एक मोठे विमान (कदाचित एईडब्ल्यू अँड सी किंवा ईएलआयएनटी) यांचा समावेश होता.
पाकिस्तानचा प्रतिसाद आणि आव्हान US on F-16 ।
तर दुसरीकडे पाकिस्तानने हे दावे पूर्णपणे फेटाळून लावले. ते म्हणाले की, “जर भारत सत्य सांगत असेल तर दोन्ही देशांनी त्यांच्या विमानांचा साठा सार्वजनिक करावा. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी आरोप केला की भारत सत्य लपवू इच्छित आहे. “असे म्हटले. मात्र, एका खाजगी टीव्ही चॅनेलने विचारलेल्या प्रश्नावर, अमेरिकन संरक्षण विभागाने एफओआयए कायद्याचा हवाला देत म्हटले की, “एजन्सींना नवीन कागदपत्रे तयार करण्याची किंवा प्रश्नांची थेट उत्तरे देण्याची आवश्यकता नाही”. पेंटागॉन आणि अमेरिकन संरक्षण सचिवांच्या प्रवक्त्यांनी या मुद्द्यावर कोणतीही अतिरिक्त टिप्पणी केली नाही.
त्याच वेळी, २०१९ मध्ये बालाकोट एअरस्ट्राइकनंतर अमेरिकेच्या संरक्षण अधिकाऱ्यांनी फॉरेन पॉलिसी मासिकाला दिलेल्या विधानाच्या विरुद्ध अमेरिकेचे मौन आता मानले जात आहे. त्यावेळी अमेरिकन अधिकाऱ्यांनी म्हटले होते की त्यांनी पाकिस्तानी एफ-१६ विमाने मोजली आहेत आणि एकही विमान गहाळ झाले नाही, तर भारताने दावा केला होता की त्यांनी एक एफ-१६ पाडले आहे.





