US Israel Iran War: इराणवर अमेरिका-इस्रायलच्या सुरू असलेल्या हल्ल्यांदरम्यान, पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी पुन्हा एकदा इराणला धमकीवजा इशारा दिला आहे. पत्रकार परिषद घेत बेंजामिन नेत्यानाहू यांनी,”सुन्नी आणि शिया दोन्ही कट्टरपंथी अतिरेकी आहेत आणि संपूर्ण जगासाठी धोका निर्माण करतात. ही समस्या आपोआपच सुटेल असे आपण म्हणू शकत नाही.” असे म्हटले आहे. पत्रकार परिषदेत नेत्यानाहू यांनी हिजबुल्लाहबद्दल बोलताना, “आम्ही लेबनीज सरकारला इशारा दिला आहे की ते आगीशी खेळत आहेत. जर त्यांनी हिजबुल्लाहला नि:शस्त्र न करता काम करू दिले तर याचा अर्थ ते स्वतःचे नशीब निवडत आहेत. जर त्यांनी कारवाई केली नाही तर आम्ही कारवाई करू.”असे म्हणाले. पुढे बोलताना नेतन्याहू यांनी, “मी जमिनीवर हे कसे केले जाईल याबद्दल तपशीलवार सांगणार नाही, परंतु मी तुम्हाला खात्री देतो की हिजबुल्लाहला याची मोठी किंमत मोजावी लागेल.” असे म्हटले. इराणी राजवटीबद्दल नेतन्याहू काय म्हणाले? US Israel Iran War: इस्रायल इराणमधील विरोधी गटांना शस्त्रास्त्र देण्याचे काम करत आहे का असे विचारले असता, नेतन्याहू यांनी, “मी आत्मविश्वासाने सांगू शकतो की इराणी लोकांच्या प्रयत्नांशिवाय राजवटी उलथवता येणार नाही आणि आम्ही त्यांना याची माहिती दिली आहे. आम्ही त्यांना कळवले आहे की मदत येत आहे.” असे त्यांनी सांगितले. US Israel Iran War: ते पुढे म्हणाले, “शेवटी काय होईल हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. मी तुम्हाला सांगणार नाही. आम्हाला माहिती आहे आणि समजते की तुम्हालाही आशा आहे की ही राजवट उलथून टाकली जाईल. जर ती संपली नाही तर ती खूप कमकुवत होईल, परंतु जर ती संपली तर समस्या सुटेल.”असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. “आपण संपूर्ण मध्य पूर्व बदलू” “इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू म्हणाले, “मी तुम्हाला वचन दिले होते की, शत्रू आणि मित्रांबद्दल, आम्ही संपूर्ण मध्य पूर्व बदलू आणि इस्रायल पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल.” आता सर्वजण हे स्वीकारत आहेत, आपले शेजारी, मग ते शत्रू असोत किंवा मित्र असोत.” “मोजतबा खामेनी यांच्या जीवाची कोणतीही हमी नाही” US Israel Iran War: इराणच्या नवीन सर्वोच्च नेत्याला इशारा देताना, इस्रायली पंतप्रधान म्हणाले की मोजतबा खमेनी यांच्या जीवाची कोणतीही हमी नाही. इस्रायल आता पूर्वीपेक्षाही मजबूत आहे. नेतान्याहू म्हणाले की त्यांच्यासाठी (मोजतबा खमेनी) कोणताही जीवन विमा नाही. जेव्हा पत्रकारांनी विचारले की इस्रायल मोजतबा खमेनी आणि हिजबुल्लाह नेते नैम कासेम यांना लक्ष्य करेल का, तेव्हा त्यांनी उत्तर दिले, “मी कोणत्याही दहशतवादी संघटनेच्या नेत्यांवर जीवन विमा पॉलिसी काढणार नाही. त्यांच्या जीवाची कोणतीही हमी नाही.”