US Iran War: “मी तिथे गेलो तर मला ठार करतील” ; डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
US Iran War: इराण युद्धात व्यस्त असलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आपल्या मुलाच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठीही वेळ मिळत नाही.

US Iran War: इराण युद्धात व्यस्त असलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना आपल्या मुलाच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठीही वेळ मिळत नाही. ट्रम्प यांनी आपला मोठा मुलगा, डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर (डॉ.) याच्या लग्नासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे.
व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी, “वेळ योग्य नाही, त्यामुळे माझ्या मुलाच्या लग्नाला उपस्थित राहणे अवघड आहे.” असे म्हणत मुलाच्या लग्नाला हजेरी लावी शकत नसल्याची खंत व्यक्त केली आहे.
“लग्नाची वेळ योग्य नाही” US Iran War
डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण युद्धामुळे आपल्या मुलाच्या लग्नाला उपस्थित राहू शकणार नाही, असे संकेत दिले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी, “या आठवड्याच्या शेवटी पाम बीच याठिकाणी प्रसिद्ध व्यक्तिमत्व बेटिना अँडरसनसोबत होणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प ज्युनियरच्या लग्नाची वेळ योग्य नाही.” असे म्हटले आहे.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी, “ते लग्नाला उपस्थित राहण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतील, परंतु इराणमधील सध्याची परिस्थिती आणि माध्यमांचे तीव्र लक्ष यामुळे वेळ काढणे अवघड होत आहे.” असेही त्यांनी म्हटले आहे.
REPORTER: ‘Are you attending your son’s wedding?’
TRUMP: ‘He’d like me to go… This not good timing for me. I have a thing called IRAN… If I do attend, I get killed. If I don’t attend, I get killed. By the fake news, of course’ pic.twitter.com/qHzFFRLiJ5
— RT (@RT_com) May 21, 2026
ट्रम्प काय म्हणाले? (US Iran War)
ट्रम्प म्हणाले, “माझ्या मुलाची इच्छा आहे की मी त्याच्या लग्नाला उपस्थित राहावे, पण माझ्यासाठी ही योग्य वेळ नाही.” माझ्यासमोर ‘इराण’सारखा एक मोठा मुद्दा आहे. ते पुढे म्हणाले, “(मी उपस्थित राहिलो तर त्याठिकाणी मला मारले जाईल. मी नाही राहिलो तरी मला मारले जाईल. (अर्थातच, खोट्या बातम्यांद्वारे.) मी लग्नाला उपस्थित राहिलो तरी माझ्यावर टीका होईल, आणि मी नाही राहिलो तरी मला लक्ष्य केले जाईल, आणि हे करणारे निःसंशयपणे आमचे ‘खोट्या बातम्या’ (माध्यमे) असतील.”असे मोठे विधान त्यांनी केले आहे.
ट्रम्प ज्युनियर यांचे या आठवड्यात लग्न होणार
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे पुत्र, डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर, या आठवड्याच्या शेवटी बहामासमध्ये एका खाजगी समारंभात विवाहबंधनात अडकणार आहेत. माध्यमांच्या वृत्तानुसार, ते पाम बीच येथील प्रसिद्ध सोशलाइट आणि मॉडेल बेटिना अँडरसन यांच्याशी विवाह करत आहेत.
केवळ काही निवडक लोक उपस्थित राहणार (US Iran War)
एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, हा विवाहसोहळा अत्यंत खाजगी आणि लहान ठेवण्यात आला आहे. पाहुण्यांची यादी खूपच मर्यादित असून, त्यात केवळ कुटुंबातील सदस्य आणि अत्यंत जवळचे मित्र आहेत. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सूचित केले आहे की इराणसोबतचा तणाव आणि स्वतःच्या सुरक्षेच्या चिंतेमुळे त्यांची उपस्थिती अद्याप निश्चित झालेली नाही.





