US Currency: १६५ वर्षांनंतर परंपरा बदलणार ; इतिहासात पहिल्यांदाच अमेरिकन डॉलरवर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची स्वाक्षरी दिसणार
US Currency : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे जेव्हापासून सत्तेत परतले आहेत तेंव्हापासून रोज नवनवीन निर्णयांचा धडाकाच त्यांनी लावला आहे.

US Currency : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे जेव्हापासून सत्तेत परतले आहेत तेंव्हापासून रोज नवनवीन निर्णयांचा धडाकाच त्यांनी लावला आहे. यातच आता आणखी एक महत्वाच्या निर्णयाची भर पडणार असल्याचे दिसत आहे. अमेरिकेतील १६५ वर्षांची एक परंपरा लवकरच मोडली जाणार आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची स्वाक्षरी लवकरच अमेरिकन चलनी नोटांवर (डॉलरवर) दिसणार आहे.
१८६१ मध्ये डॉलर चलनात आल्यापासून, एखाद्या विद्यमान राष्ट्राध्यक्षांची स्वाक्षरी चलनी नोटांवर दिसण्याची ही पहिलीच वेळ असेल. अमेरिका यावर्षी आपल्या स्वातंत्र्याचा २५० वा वर्धापनदिन साजरा करत असताना, अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने हा निर्णय घेतला आहे.
अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाचे अधिकारी ब्रँडन बीच यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमध्ये याविषयी माहिती दिली. बीच यांनी याविषयी बोलताना, “अमेरिकेच्या २५० व्या वर्धापनदिनानिमित्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड जे. ट्रम्प यांच्या स्वाक्षरीसह ट्रेझरी सचिव स्कॉट बेसान्ट यांची स्वाक्षरी लवकरच अमेरिकन चलनी नोटांवर दिसेल. इतिहासात असे प्रथमच घडत असून, हे राष्ट्राध्यक्षांचे नेतृत्व आणि आपल्या महान राष्ट्राप्रती असलेल्या त्यांच्या समर्पणाचे प्रतीक आहे.”असे त्यांनी म्हटले आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला, एका फेडरल आर्ट कमिशनने अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या २५० व्या वर्धापनदिनानिमित्त ट्रम्प यांचे चित्र असलेल्या २४-कॅरेट सोन्याच्या स्मारक नाण्याच्या अंतिम डिझाइनला मंजुरी दिली होती. US Currency
ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसंट यांनी एका निवेदनात , “राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली, आपण अभूतपूर्व आर्थिक वाढ, डॉलरचे दीर्घकाळ टिकणारे वर्चस्व आणि आर्थिक सामर्थ्य व स्थिरतेच्या मार्गावर आहोत. आपल्या महान देशाचा आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड जे. ट्रम्प यांच्या ऐतिहासिक कामगिरीचा गौरव करण्याचा, अमेरिकन डॉलरच्या नोटांवर त्यांचे नाव असण्यापेक्षा अधिक प्रभावी मार्ग नाही, आणि २५० व्या वर्धापन दिनानिमित्त हे ऐतिहासिक नाणे जारी करणे पूर्णपणे योग्य आहे.” असे म्हटले आहे.
In celebration of America’s 250th anniversary, President Donald J. Trump’s signature alongside @SecScottBessent‘s will soon appear on U.S. currency, marking a first in history, and symbolizes @POTUS‘ leadership and dedication to our great nation will carry a lasting impact.…
— U.S. Treasurer Brandon Beach (@TreasurerBeach) March 26, 2026
ब्रँडन बीच यांनी याविषयी बोलताना, अमेरिकेच्या ‘सुवर्णयुगा’तील आर्थिक पुनरुज्जीवनाचे शिल्पकार म्हणून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची ख्याती निर्विवाद आहे, आणि अमेरिकन चलनावर त्यांची स्वाक्षरी छापणे केवळ योग्यच नाही, तर पूर्णपणे समर्थनीय देखील आहे. असे म्हटले. त्यासोबतच ते म्हणाले, “आपल्या महान राष्ट्राचा २५० वा वर्धापन दिन जवळ येत असताना, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकन लोकांची समृद्धी, सामर्थ्य आणि अढळ भावना यांचे प्रतीक म्हणून अमेरिकन चलन कायम राहील.”
तर पुढे बोलताना त्यांनी , “अमेरिकेच्या ‘सुवर्णयुगा’तील आर्थिक पुनरुज्जीवनाचे शिल्पकार म्हणून राष्ट्राध्यक्षांनी इतिहासावर उमटवलेला ठसा निर्विवाद आहे. अमेरिकन चलनी नोटांवर त्यांची स्वाक्षरी छापणे केवळ योग्यच नाही, तर ते त्याचे पूर्णपणे हक्कदार आहेत.” असे म्हटले.
In celebration of America’s 250th anniversary, President Donald J. Trump’s signature alongside @SecScottBessent‘s will soon appear on U.S. currency, marking a first in history, and symbolizes @POTUS‘ leadership and dedication to our great nation will carry a lasting impact.…
— U.S. Treasurer Brandon Beach (@TreasurerBeach) March 26, 2026
अमेरिकन डॉलरचा इतिहास US Currency :
१८६१–१९१४: सुरुवातीच्या संघीय चलनी नोटा—’ग्रीनबॅक्स’ आणि मागणी नोटा—यांवर, सचिव सॅल्मन पी. चेस यांच्यापासून सुरुवात करून, नोटांना अधिकृतता देण्यासाठी प्रमुख ट्रेझरी अधिकाऱ्यांची चित्रे छापण्याची प्रथा सुरू झाली.
१९१४–२०२५: सर्व फेडरल रिझर्व्ह नोटांवर अमेरिकेचे ट्रेझरर (कोषाध्यक्ष) आणि ट्रेझरी सेक्रेटरी (कोषागार सचिव) या दोघांच्याही स्वाक्षऱ्या छापण्याची आधुनिक प्रथा प्रमाणित झाली.
मार्च २०२६: ट्रेझरी विभागाने जाहीर केले की नवीन नोटांवर ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसंट तसेच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वाक्षऱ्या असतील. या निर्णयामुळे केवळ ट्रेझरर/सेक्रेटरी यांच्या स्वाक्षऱ्या छापण्याची १६५ वर्षे जुनी परंपरा खंडित झाली.
जून २०२६: ट्रम्प यांची स्वाक्षरी असलेल्या नोटांची सुरुवात १०० डॉलरच्या नोटांपासून होईल.
कोषाध्यक्षांना पदावरून हटवणे: हा २०२६ चा बदल म्हणजे विशेषतः अमेरिकेच्या कोषाध्यक्षांची स्वाक्षरी काढून टाकणे होय.






