US banned 6 indian companies । अमेरिकेने भारताला आणखी एक धक्का दिला आहे. एकीकडे अमेरिकेने भारतावर २५% कर लादण्याची घोषणा केली आहे, तर दुसरीकडे ट्रम्प प्रशासन एवढ्यावरच थांबले नाही. भारताने रशियासोबत व्यवसाय केल्याबद्दल दंड जाहीर करण्यात आला आहे, तर इराणसोबत पेट्रोलियम उत्पादनांच्या व्यवहार केल्याबद्दल भारताविरुद्ध मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाई अंतर्गत ६ भारतीय कंपन्यांवर अमेरिकेकडून बंदी घालण्यात आली आहे. रशियासोबतच नव्हे तर इराणसोबतही व्यवसाय अमान्य US banned 6 indian companies । अमेरिकेने रशियासोबत व्यवसाय केल्याबद्दल भारतावर दंड लावण्याची घोषणा केली, तर इराणसोबत पेट्रोलियम उत्पादनांचा व्यवहार करणाऱ्या भारतीय कंपन्याही अमेरिकेच्या निशाण्यावर आल्या आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, कार्यकारी आदेश (ई.ओ.) १३८४६ अंतर्गत ६ भारतीय कंपन्यांवर बंदी घालण्यात आली आहे. ट्रम्प प्रशासनाचा हा निर्णय प्रत्यक्षात थेट इराणच्या पेट्रोलियम आणि पेट्रोकेमिकल क्षेत्राला लक्ष्य करत आहे. या भारतीय कंपन्यांवर बंदी घालण्याची घोषणा करताना, डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने,” ते जाणूनबुजून इराणी पेट्रोलियम उत्पादनांच्या खरेदी आणि वितरणासाठी महत्त्वपूर्ण व्यवहारांमध्ये सहभागी आहेत, जे इराणवर लादलेल्या अमेरिकेच्या निर्बंधांचे थेट उल्लंघन आहे” असा गंभीर आरोप केला आहे. ‘या’ कंपन्यांवर घालण्यात आली बंदी US banned 6 indian companies । अमेरिकेने बंदी घातलेल्या भारतीय कंपन्यांमध्ये देशातील काही आघाडीच्या पेट्रोकेमिकल व्यवसाय गटांचा समावेश आहे. यामध्ये कांचन पॉलिमर्सचा समावेश आहे, ज्यांनी तानाइस ट्रेडिंगमधून पॉलिथिलीनसह १.३ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त किमतीची इराणी पेट्रोकेमिकल उत्पादने आयात आणि खरेदी केली आहेत, ज्यामुळे त्यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतर बंदी घातलेल्या भारतीय वंशाच्या कंपन्यांच्या यादीत अल्केमिकल सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड हे पुढचे नाव आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या मते, त्यांनी जानेवारी ते डिसेंबर २०२४ दरम्यान अनेक कंपन्यांकडून $८४ दशलक्ष पेक्षा जास्त किमतीची इराणी पेट्रोकेमिकल उत्पादने आयात आणि खरेदी केली आहेत. रमणिकलाल एस गोसालिया अँड कंपनी ही भारतस्थित पेट्रोकेमिकल कंपनी आहे. ज्याने जानेवारी २०२४ ते जानेवारी २०२५ दरम्यान अनेक कंपन्यांकडून $२२ दशलक्ष पेक्षा जास्त किमतीची इराणी पेट्रोकेमिकल उत्पादने आयात केली, ज्यात मिथेनॉल आणि टोल्युइनचा समावेश आहे.