US attack on Iran : ‘मोजतबा खामेनी 90% संपले’ ; इराणवर अमेरिकेच्या हल्ल्यादरम्यान ट्रम्पचा मोठा दावा
US attack on Iran : अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. अलीकडेच, अमेरिकेने इराणच्या अनेक तळांवर हल्ला करून मोठे नुकसान केले.

US attack on Iran : अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. अलीकडेच, अमेरिकेने इराणच्या अनेक तळांवर हल्ला करून मोठे नुकसान केले. प्रत्युत्तरादाखल, इराणने अमेरिकेच्या लष्करी तळांवर मोठा हल्ला चढवला.
दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या युद्धाच्या पार्श्वभूमीवर एक धाडसी दावा केला आहे. ट्रम्प म्हणाले की, अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये इराणने आपली लष्करी क्षमता आणि सर्वोच्च सेनापती गमावले आहेत.
पुढे बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी,” इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी, जे गेल्या आठवड्यात त्यांचे वडील, दिवंगत अयातुल्ला अली खामेनी यांच्या अंत्यविधीला उपस्थित नव्हते, ते देखील ९०% संपले आहेत” असे त्यांनी म्हटले.
एक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी, “त्यांच्याकडे नौदल किंवा हवाई दल नाही; सर्व काही संपले आहे.” असेही सांगितले. त्यांची विमानविरोधी यंत्रणा नष्ट झाली आहे, त्यांचे सर्व नेते मरण पावले आहेत, त्यांचे सर्वोत्तम नेते गेले आहेत” असाही दावा त्यांनी केला आहे.
ट्रम्प यांनी पुढे असा दावा केला की, इराणचे सर्वोत्तम नेते या युद्धात मारले गेले आहेत. अध्यक्ष म्हणाले, “ते गेले. खामेनी गेले.त्यासोबतच त्यांचा मुलगा ९० टक्के गेला आहे.”
दरम्यान, अली खामेनी २८ फेब्रुवारी रोजी, युद्धाच्या पहिल्याच दिवशी मारले गेले. मोजतबा खामेनी २८ फेब्रुवारीपासून सार्वजनिक ठिकाणी दिसलेले नाहीत. असा दावा करण्यात आला होता की ते अमेरिकेच्या हल्ल्यात जखमी झाले होते.
इराणविरुद्ध लष्करी कारवाई पुन्हा सुरू US attack on Iran :
आठवड्याच्या शेवटी अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा झालेल्या हल्ल्यांनंतर ट्रम्प यांचे हे विधान आले आहे, ज्यामुळे अनेक महिन्यांपासून सुरू असलेला शस्त्रसंधी संपुष्टात आला. इराणच्या लक्ष्यांवर झालेल्या अनेक हल्ल्यांनंतर, अमेरिकेच्या अध्यक्षांनी गेल्या आठवड्यात इराणविरुद्ध लष्करी कारवाई पुन्हा सुरू झाल्याची अधिकृत सूचना काँग्रेसला दिली.
अमेरिका इतर जहाजांवर शुल्क आकारणार US attack on Iran :
डोनाल्ड ट्रम्प यांनी असेही सांगितले की, अमेरिका इतर जहाजांकडून सुरक्षित मार्गासाठी शुल्क आकारेल.






