US Iran War: सहा शहरांवर पाच तास बॉम्बवर्षाव! इराणने अमेरिकेचे MQ-1 विमान पाडल्याचा दावा; होर्मुझमधील युद्धामुळे इंधनाच्या किमती वाढल्या
US Iran War: अमेरिका आणि इराण यांच्यातील सुरू असलेले युद्ध प्राणघातक पातळीवर पोहोचले आहे. आज अमेरिकेने सहापेक्षा जास्त इराणी तळांवर हल्ला केल्याचा दावा करण्यात आला आहे.

US Iran War: अमेरिका आणि इराण यांच्यातील सुरू असलेले युद्ध प्राणघातक पातळीवर पोहोचले आहे. आज अमेरिकेने सहापेक्षा जास्त इराणी तळांवर हल्ला केल्याचा दावा करण्यात आला आहे.
अमेरिकेचे हे हल्ले सुमारे पाच तास चालले. तर इराणनेही अमेरिकेच्या अनेक लष्करी तळांना लक्ष्य करून जोरदार प्रत्युत्तर दिले आल्याची माहिती समोर येत आहे. या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीही पुन्हा वाढल्या असून, त्यात सुमारे २ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (सेंटकॉम) , १३ जुलैच्या रात्री इराणविरोधात पाच तासांची कारवाई झाली. या कारवाईदरम्यान, अमेरिकी सैन्याने बुशेहर, चाबहार, जास्क, कोनारक, अबू मुसा आणि बंदर अब्बास यासह अनेक लष्करी तळांवर अचूक हल्ले केले असे म्हटले आहे.
इराणची संरक्षण यंत्रणा, क्षेपणास्त्र आणि ड्रोन तळ नष्ट करणे हा या हल्ल्यांचा उद्देश होता असा अमेरिकेचा दावा आहे. तसेच, सध्या मध्य-पूर्वेत ५०,००० पेक्षा जास्त अमेरिकी सैनिक तैनात असल्याचेही सांगण्यात आले.
इराणकडून अमेरिकेला सडेतोड प्रत्युत्तर US Iran War:
दरम्यान, इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) बहरीनमधील अल-जुफैर तळावरील शस्त्रागार, उपग्रह दळणवळण केंद्र आणि अमेरिकी सैनिकांच्या निवासस्थानाच्या इमारतीला लक्ष्य केल्याचा दावा केला आहे. IRGC ने अमेरिकेचा एक MQ-1 ड्रोन पाडल्याचाही दावा केला आहे.
युद्धामुळे तेलाच्या किमतीत वाढ
या वाढत्या लष्करी संघर्षाचा परिणाम जागतिक तेल बाजारावर स्पष्टपणे दिसून येत आहे. ब्रेंट क्रूडच्या किमती प्रति बॅरल जवळपास ८५ डॉलरपर्यंत आणि WTI क्रूडच्या किमती प्रति बॅरल जवळपास ८० डॉलरपर्यंत वाढल्या आहेत. तेलाच्या किमती एका महिन्याच्या उच्चांकावर पोहोचल्याने जागतिक ऊर्जा पुरवठा आणि महागाईबद्दल चिंता वाढली आहे.
अमेरिका-इराण युद्धाबद्दल १० प्रमुख तथ्ये
* अमेरिकी सैन्याने इराणच्या अनेक लष्करी तळांवर पाच तासांची कारवाई केली.
* अमेरिकेने बुशेहर, चाबहार, जास्क, कोनारक, अबू मुसा आणि बंदर अब्बास यांना लक्ष्य केले.
* अमेरिकेने संरक्षण यंत्रणा, क्षेपणास्त्रे, ड्रोन आणि नौदलालाही लक्ष्य केले.
* मध्य पूर्वेत ५०,००० हून अधिक अमेरिकी सैनिक उच्च सतर्कतेवर आहेत.
* आयआरजीसीने बहरीनच्या अल-जुफैर तळावर प्रत्युत्तरात्मक हल्ला केल्याचा दावा केला आहे.
* इराणनेही दोन सुपर ऑइल टँकर्सवर हल्ला केल्याचा दावा केला आहे.
* संयुक्त अरब अमिरातीने होर्मुझ प्रदेशात आपल्या दोन तेल टँकर्सवर हल्ला झाल्याचा आरोप केला आहे.
* संयुक्त राष्ट्रांमध्ये, इराणने अमेरिकेवर करारांना सुरुंग लावल्याचा आरोप केला.
*युद्धाच्या वाढत्या धोक्यामुळे जागतिक तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली.
* अमेरिका-इराण युद्धामुळे इंधन पुरवठा आणि सागरी व्यापार, तसेच प्रादेशिक सुरक्षेचे संकट अधिक गडद झाले आहे.
दरम्यान, अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता करारावर सहमती झाली होती, परंतु इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीत दोन जहाजांवर हल्ला केला. अमेरिकेने प्रत्युत्तर दिले, ज्यामुळे युद्धाची आग पुन्हा भडकली.







