अमेरिकेने नायजेरियात हवाई हल्ले का केले? ; ट्रम्प यांनी सांगितले खरे कारण, पहा हल्ल्याचा व्हिडिओ

US airstrike Nigeria। अमेरिकेने नायजेरियातील आयसिसच्या ठिकाणांवर मोठा हल्ला केला आहे. अमेरिकेच्या हवाई दलाने वायव्य नायजेरियात हवाई हल्ला केला, ज्याचा व्हिडिओ देखील अमेरिकेने प्रसिद्ध केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियाद्वारे ही कारवाई जाहीर केली.
या संदर्भात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही या हल्ल्यांचे कारण स्पष्ट केले. ट्रम्प यांनी आयसिसच्या दहशतवाद्यांना “दहशतवादी कचरा” म्हणून संबोधले. त्यांनी, “ही संघटना या भागातील ख्रिश्चनांना सतत लक्ष्य करत आहे”असे म्हणाले. ख्रिश्चनांवरील हल्ल्यांना अस्तित्वाचा धोका असल्याचे सांगून अध्यक्ष ट्रम्प म्हणाले की, या हल्ल्यांपूर्वी त्यांनी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये नायजेरियाला लष्करी कारवाईचा इशारा दिला होता. त्यांच्या मते, नायजेरियातील ख्रिश्चनांवरील हल्ले नरसंहारासारखे होते आणि त्यांच्या अस्तित्वाला थेट धोका निर्माण करत होते.
.@POTUS “Tonight, at my direction as Commander in Chief, the United States launched a powerful and deadly strike against ISIS Terrorist Scum in Northwest Nigeria, who have been targeting and viciously killing, primarily, innocent Christians, at levels not seen for many years, and… pic.twitter.com/ct7rUW128t
— Department of War 🇺🇸 (@DeptofWar) December 26, 2025
निष्पाप ख्रिश्चनांच्या क्रूर हत्येचे आरोप US airstrike Nigeria।
ट्रम्प म्हणाले की, अमेरिकेचे हल्ले निरपराध ख्रिश्चनांना लक्ष्य करणाऱ्या आणि क्रूरपणे मारणाऱ्या दहशतवाद्यांवर करण्यात आले. त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर लिहिले, “मी या दहशतवाद्यांना आधीच इशारा दिला होता की जर त्यांनी ख्रिश्चनांचा नरसंहार थांबवला नाही तर त्यांना मोठी किंमत मोजावी लागेल. आज रात्री तेच घडले. युद्ध विभागाने अनेक अचूक हल्ले केले, जे फक्त अमेरिकाच करू शकते.”असे त्यांनी म्हटले. ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितले की, त्यांच्या नेतृत्वाखाली, कोणत्याही परिस्थितीत कट्टरपंथी इस्लामिक दहशतवाद वाढू दिला जाणार नाही.
नायजेरियन सरकारने अमेरिकेशी सहकार्याची पुष्टी केली US airstrike Nigeria।
नायजेरियन परराष्ट्र मंत्रालयाने हवाई हल्ल्यांना पुष्टी दिली आणि म्हटले की ही कारवाई नायजेरिया आणि अमेरिकेतील चालू सुरक्षा सहकार्याचा एक भाग होती. या सहकार्यात गुप्तचर माहिती सामायिकरण आणि दहशतवादी संघटनांना लक्ष्य करण्यासाठी धोरणात्मक समन्वय समाविष्ट आहे.





